Google Pixel 7a Launched : प्रतीक्षा संपली ! Google Pixel 7a लॉन्च, 8 GB रॅमसह मिळणार वायरलेस चार्जिंग सपोर्ट; जाणून घ्या किंमत

Google I/O 2023 : कालच पार पडलेल्या गुगलच्या I/O 2023 डेव्हलपर इव्हेंटमध्ये बरीच नवीन प्रोडक्ट लॉन्च केले आहेत.
Google Pixel 7a Launched
Google Pixel 7a Launched Saam Tv
Published On

Google Pixel 7a Features : कालच पार पडलेल्या गुगलच्या I/O 2023 डेव्हलपर इव्हेंटमध्ये बरीच नवीन प्रोडक्ट लॉन्च केले आहेत. यामध्ये ग्राहकांना असणाऱ्या सर्वात दमदार फोनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या इंव्हेंटमध्ये Google Pixel 7a लॉन्च करण्यात आला आहे. ज्याची लोक आतुरतेने वाट पाहात होते.

Google Pixel 7a हा फोन (Phone) अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असेल असे मत सुंदर पिचाई यांनी मांडले. या फोनमध्ये 8GB रॅमसह 64 मेगापिक्सेल कॅमेरा, डिस्प्ले व दमदार अशी बॅटरी असेल. हा Pixel 7a फोन वायरलेस चार्जिंग सपोर्टसह मिळणार आहे. हा फोन भारतात ११ मे पासून खरेदी करण्यासाठी बाजारात उपलब्ध राहिल. तसेच यावर बंपर डिस्काउंट देखील मिळणार आहे. जाणून घेऊया त्याचे फीचर्स (Features)

Google Pixel 7a Launched
Realme 5G Phone: लवकरच लॉन्च होणार Realme चा नवा 5G फोन ! जाणून घ्या फीचर्स व किंमत

1. Google Pixel 7a किंमत

  • Google Pixel 7a भारतात 8GB रॅम आणि 12GB स्टोरेजसह लॉन्च झाला आहे.

  • या फोनची किंमत ४३,९९९ रुपये असून तो ११ मे पासून फ्लिपकार्टवर ऑनलाइन खरेदी करता येईल

2. कसा कराल खरेदी ?

HDFC बँकेच्या कार्डने केलेल्या खरेदीवर ४००० रुपयांची सुट मिळणार आहे. त्यामुळे हा फोन ३९,९९९ रुपयांना मिळेल. तसेच हा फोन चारकोल, स्नो व सी या तीन रंगामध्ये खरेदी करता येईल.

Google Pixel 7a Launched
Nomophobia Disease : धक्कादायक! देशात चारपैकी तीन व्यक्तींना Nomophobia आजार? तज्ज्ञांनी सांगितले कारण

3. Google Pixel 7a स्पेस्फिकेशन

  • Google Pixel 7a मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.1 इंचाचा फुल - एचडी+ OLED डिस्प्ले मिळत आहे. हे स्पेस्फिकेशन पिक्सेल ए-सिरीजसाठी पहिले असून फोन 60Hz रिफ्रेश रेटसह येतो.

  • डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 स्क्रीनद्वारे सुरक्षित असून HDR सपोर्टसह येतो.

  • तसेच फोनला फिंगरप्रिंट स्कॅनर डिस्प्लेमध्ये एम्बेड केले आहे.

4. 8GB RAM आणि प्रोसेसर

  • Google ने Pixel 7a च्या प्रोसेसरला त्याच्या नवीन Tensor G2 प्रोसेसरमध्ये अपग्रेड केले आहे, जे त्याच्या प्रीमियम Pixel 7 आणि Pixel 7 Pro स्मार्टफोनला अधिक नवीन बनवते.

  • प्रोसेसर, जो त्याच्या Titan M2 सुरक्षा सह-प्रोसेसरसह येतो, 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसह मिळतो आहे.

  • फोनवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ v5.3 आणि USL ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमसह NFC समाविष्ट आहे. फोनमध्ये USB Type-C पोर्ट देखील आहे. तसेच हा फोन वायरलेस चार्जिंगसह मिळतो आहे.

  • 4385mAh बॅटरी असून गुगल त्यांच्या Qi चार्जिंगला समर्थन देते आहे.

Google Pixel 7a Launched
National Technology Day : स्लो इंटरनेट स्पीडमुळे त्रस्त आहात ? फोनमध्ये याप्रकारे एक्टिव्ह करा 5G नेटवर्क, फॉलो करा या स्टेप्स...

5. कॅमेरा (Camera)

  • फोटोग्राफीसाठी, Pixel 7a मध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 64 - मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.

  • यात 13-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल कॅमेरा आहे.

  • सेल्फीसाठी फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

  • हा फोन Android 13 सह Google Pixel सॉफ्टवेअरचा अनुभव देतो आणि नवीन Tensor G2 प्रोसेसरमुळे, Pixel 7a ला शार्प नाईट साइट, लॉंग एक्सपोजर मोड यासारखी कॅमेरा वैशिष्ट्ये मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com