Parenting Tips : प्रत्येक पालकांनी 'या' टिप्स फॉलो केल्याच पाहिजेत? मुलांवर ओरडण्याची एकदाही वेळ येणार नाही

Good Parenting Tips : लहान मुलांची काळजी घेताना प्रत्येक पालकांनी या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. यामुळे मुलं हट्टी आणि खोडकर होत नाहीत.
Good Parenting Tips
Parenting Tips Saam TV
Published On

संपूर्ण जगातील कामांमध्ये लहान मुलांना संभाळण्याइतकं कठीण काम कोणतंच नाही, असं म्हटलं जातं. हे काम इतकं कठीण असून देखील लहान मुलांना सांभाळण्याच्या कामात कोणताही पुरस्कार दिला जात नाही. लहान मुलं म्हणजे एक कोरी पाटी असते. यावर तुम्ही जे लिहिणार ते लिहिले जाते. म्हणजे लहान मुलांना तुम्ही जसे घडवता तसेच ते घडतात.

प्रत्येक पालकांना आपलं मुल शाळेत, अभ्यासात, खेळात आणि व्यवहारात सगळ्यात हुशार असावं असं वाटतं. त्यासाठी मुलांना विविध गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्वांमध्ये काही वेळा आपण चुकून काही अपशब्दांचा उच्चार करतो. अपशब्द वापरल्यावर मुलं लगेचच अशा गोष्टी कॅच करतात आणि तसंच बोलू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पालकांनी मुलांसाठी कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत याची माहिती सांगणार आहोत.

Good Parenting Tips
Parenting Tips : पालकांच्या चुका मुलांचा आत्मविश्वास कमी होण्यास कारणीभूत, वागायचं कसं? समजून घ्या

मुलांना योग्य गोष्टी शिकवा आणि योग्य रस्ता दाखवा

आयुष्यात जगताना मुलं थोडी मोठी झाली की ते त्यांच्या मनाला पटेल तसंच वागू लागतात. तुमच्या मुलांनी असे करू नये यासाठी पालकांनी त्यांना काय बरोबर आणि काय चूक हे समजावून सांगितले पाहिजे. तसेच योग्य दिशा आणि योग्य रस्ता मुलांना दाखवला पाहिजे. मुलांच्या आयुष्यातील प्रथम गुरू आई-वडील असतात. त्यामुळे मुलं चुकत असतील तर त्यांच्यावर ओरडू नका. मुलांवर ओरडण्याऐवजी त्यांना योग्य मार्ग काय आहे हे समजावून सांगा.

मुलांना स्वावलंबी बनवा

आयुष्यात नाती जपणे आणि पैसे कमवणे किती महत्वाचे आहे हे समजावून सांगा. पैसे कमवण्यासाठी एका व्यक्तीला किती मेहनत घ्यावी लागते याची जाणीव करून द्या. तसेच आपला खर्च आपण स्वत: कशा पद्धतीने पूर्ण करू शकू या गोष्टी मुलांना शिकवा आणि त्यांना स्वावलंबी बनवा.

मुलांवर रागापेक्षा प्रेम जास्त व्यक्त करा

लहान मुलं म्हणजे देवा घरची फुलं. तुमची मुलं आता शाळेत जात असतील आणि फार जास्त हट्टीपणा किंवा मस्तीखोरपणा करत असतील तर त्यांना मारहाण करू नका. त्या ऐवजी मुलांना यात काय चुक आहे ते समजावून सांगा. त्यामुळे मुलं शांत होतात आणि निट वागतात.

Good Parenting Tips
Girls Parent Tip : तुमच्या चिमुकल्या मुलींना शाळेत पाठताय?तर शिकवा 'या' गोष्टी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com