Cervical Cancer: महिलांसाठी आनंदाची बातमी; गर्भाशयाच्या कॅन्सरवरील लस मोफत

Cervical Cancer Vaccine: भारतात दरवर्षी गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे सुमारे सव्वा लाख रुग्ण आढळतात. बिहार सरकारने या कॅन्सरवरची ‘एचपीव्ही’ ही लस सर्व वयोगटाती महिलांसाठी मोफत देण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रातही या कर्करोगाबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. पाहूया एक रिपोर्ट.
Cervical Cancer: महिलांसाठी आनंदाची बातमी; गर्भाशयाच्या कॅन्सरवरील लस मोफत
Cervical Cancer Vaccine
Published On

भारतात कॅन्सर ही मोठी समस्या बनत चालली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, 2023 मध्ये भारतात कॅन्सरच्या 14 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झालीय. जगभरात गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत चाललंय. यामुळे दरवर्षी हजारो महिलांचा मृत्यू होतो.

मात्र आता गर्भाशयाच्या मुखातल्या कॅन्सरनं पीडित महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता महिलांना ना उपचारासाठी भटकण्याची गरज आहे ना पैशांसाठी. कारण ही लस महिलांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बिहारमध्ये गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर रोखण्यासाठी 'मुख्यमंत्री बालिका कर्करोग लसीकरण योजने'ला मंजुरी देण्यात आली आहे.

गर्भाशयाच्या कॅन्सरच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता ९ ते १४ वर्षांच्या मुलींना ‘एचपीव्ही’ची लस मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत याचा समावेश झाला तर सर्वच वयोगटासाठी ती मोफत उपलब्ध होणार आहे.

गर्भाशयाच्या कॅन्सरची लक्षणे पाहूया

समागमानंतर योनीतून रक्तस्त्राव

योनीमार्गात तीव्र वेदना आणि सूज जाणवणे

योनीतून रक्तस्त्राव झाल्यामुळे दुर्गंधी

सेक्स करताना वेदना जाणवणे

मासिक पाळीव्यतिरिक्त योनीतून रक्तस्त्राव

भारतात दरवर्षी गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची सुमारे 1 लाख 20 हजार रुग्ण आढळतात. देशात कर्करोगामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी १०% मृत्यू हे या प्रकारच्या कर्करोगामुळे होतात. भारतात कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे हे तिसरे सर्वात मोठे कारण आहे. या कर्करोगाची लक्षणे पाहूयात.

गर्भाशयाचा कॅन्सर टाळण्यासाठी, जर एखादी महिला लैंगिकदृष्ट्या सक्रिय असेल, तर ती तिची 'पॅप स्मीअर' चाचणी करून घेऊ शकते. 30 वर्षांनंतर आणि लैंगिकदृष्ट्या सक्रिय झाल्यानंतर, तुम्ही दर 5 वर्षांनी 'पॅप स्मीअर' चाचणी करून घेऊ शकता. जेणेकरून हा कर्करोग वेळेत ओळखता येईल. डॉक्टरांच्या मते, स्त्रीने वयाच्या ६५ वर्षापर्यंत या चाचण्या कराव्यात.

गर्भाशयाच्या कॅन्सरची ही लस सिरमनं निर्माण केलीय. यामुळे बिहारमधल्या महिलांना मोठा दिलसा मिळणार आहे. मात्र हेच धोरण महाराष्ट्र सरकारनेही राबवलं तर राज्यातल्या महिलांनाही गर्भाशयाच्या कॅन्सरपासून मुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Cervical Cancer: महिलांसाठी आनंदाची बातमी; गर्भाशयाच्या कॅन्सरवरील लस मोफत
मेंदूच्या नसा ब्लॉक होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; चुकूनही दुर्लक्ष करू नका!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com