शरीरात रक्तप्रवाह उत्तम होण्यासाठी 'ही' योगासने नक्की करून बघा...

उत्तम रक्तप्रवाहामुळे शरीरात अनेक महत्त्वाचे फायदे होतात. योग्य रक्तप्रवाह शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये वितरीत करतो.
blood flow
blood flow yandex
Published On

उत्तम रक्तप्रवाहामुळे शरीरात अनेक महत्त्वाचे फायदे होतात. योग्य रक्तप्रवाह शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये वितरीत करतो. त्यांचे सुरळीत कार्य सुनिश्चित करते. जेव्हा रक्ताभिसरण व्यवस्थित होते, तेव्हा शरीरातील चयापचय क्रिया सुधारते. आणि हृदय निरोगी राहते आणि स्नायूंना पुरेशी ऊर्जा मिळते. 

रक्ताभिसरणाचे फायदे -

१.योग्य रक्ताभिसरण हृदयाला अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्यास मदत करते, त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या समस्यांचा धोका कमी होतो.

२.रक्ताभिसरणामुळे ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा योग्य प्रवाह स्नायूंना ऊर्जा प्रदान करतो, ज्यामुळे थकवा कमी होतो आणि शरीर अधिक सक्रिय राहते.

blood flow
Blood Sugar: जेवल्यानंतर पायी चालल्याने ब्लड शुगर लेवल कमी होते? तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

३. योग्य रक्ताभिसरण त्वचेला पोषक आणि ऑक्सिजन प्रदान करते, ज्यामुळे त्वचा अधिक निरोगी, चमकदार आणि तरुण दिसते.

४. उत्तम रक्ताभिसरणामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, कारण रक्ताच्या माध्यमातून पांढऱ्या रक्त पेशी संक्रमण आणि रोगांशी लढण्यासाठी शरीरात जलद कार्य करतात.

५. जेव्हा मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वे मिळतात, तेव्हा स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक स्पष्टता सुधारते.

रक्ताभिसरणा सुधारण्यासाठी योग

नियमित योगासने केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. काही योगासने फुफ्फुस, हृदय आणि स्नायू यांच्यामध्ये ऑक्सिजन आणि रक्त प्रवाहाला प्रोत्साहन देतात. रक्ताभिसरण वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या योगासनांविषयी जाणून घेऊया-

१. व्रजासन

या आसनाचा सराव करण्यासाठी, गुडघ्यावर बसून टाचेवर जोर द्या. पाठीचा कणा सरळ ठेवा. डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. या आसनाचा सराव केल्याने पचनक्रिया सुधारते आणि रक्ताभिसरण नियंत्रित राहते. पोटाच्या स्नायूंवर दबाव येतो आणि शरीराच्या खालच्या भागात रक्त प्रवाह वाढतो.

२. त्रिकोनासन 

दोन्ही पाय पसरून उभे राहा आणि उजवा हात खाली वाकवून उजव्या पायाजवळ ठेवा. आता डावा हात वरच्या दिशेने सरळ करा आणि मान वरच्या दिशेने ठेवा. या आसनाचा सराव केल्याने रक्त प्रवाह वाढतो आणि हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

३. शवासन 

या आसनाच्या सरावाने शरीराला आराम देण्यासोबत रक्ताभिसरण नियंत्रित ठेवता येते. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक ताण दूर होण्यास मदत होते. हे आसन करण्यासाठी पाठीवर झोपा आणि शरीर पूर्णपणे सैल सोडा. या दरम्यान खोल आणि आरामदायी श्वास घ्या.

४. सेतुबंधासन 

सेतुबंधासनाचा सराव करण्यासाठी, पाठीवर झोपा, गुडघे वाकवा आणि आपली कंबर पुलासारखी बनवा. जमिनीवर हात ठेवून दीर्घ श्वास घ्या. या आसनाचा सराव केल्याने हृदय आणि फुफ्फुसांचे कार्य सुधारते, ज्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होतो.

Edited by - अर्चना चव्हाण

blood flow
Veg Bombil Fry: व्हेज खाणाऱ्यांसाठी स्पेशल डिश; फक्त १० मिनिटात तयार करा व्हेज बोंबिल फ्राय रेसिपी

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com