Summer Travel Tips : उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाताय? तर 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा, प्रवास होईल अधिक सुखकर !

Summer Travel : उन्हाळ्यात प्रवास करणे फार कमी लोकांना आवडते.
Summer Travel Tips
Summer Travel TipsSaam Tv

Travel Tips For Summer : उन्हाळ्यात प्रवास करणे फार कमी लोकांना आवडते, कारण या काळात शरीरात पाण्याची कमतरता किंवा टॅनिंग सारख्या समस्या उद्भवू शकतात. उन्हामुळे शारीरिक त्रास होत असल्याने बरेच वेळा आपल्याला बॅगेत काय घेऊन जायचे हा प्रश्न पडतो. उन्हात प्रवास करताना बॅगेत या गोष्टी असणे खूप गरजेचे असते. बॅगेत कोणत्या वस्तू ठेवल्या पाहिजेत हे जाणून घ्या.

जर तुम्हाला उन्हाळ्यातही प्रवास करायला आवडत असेल तर पूर्ण तयारीनिशी निघणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. काहीवेळा लोक (People) काही महत्त्वाच्या गोष्टी घरी सोडतात आणि वाटेत अडचणी येतात. प्रवासादरम्यान या गोष्टी सोबत ठेवा.

Summer Travel Tips
Summer Hair Care : उन्हाळ्यात तुमचे केसही घामाने भिजताय ? सतत केसात खाज लागते ? मग या टिप्स फॉलो करा

सनस्क्रीन -

केवळ सूर्यप्रकाशच नाही तर हवामानात असलेल्या उष्णतेमुळेही त्वचेवर टॅनिंग होते. प्रवास असो किंवा सामान्य जीवनात, घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावणे खूप गरजेचे आहे. तुम्ही सहलीला जात असाल तर नक्कीच बॅगेत ठेवा.

पाणी -

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी अधिकाधिक पाणी (Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. प्रवास करताना किमान 2 लिटर पाणी सोबत ठेवावे. तुम्ही थंड प्रदेशात फिरायला जात असाल, पण तुमच्या पिशवीत पाणी नक्कीच ठेवा.

Summer Travel Tips
Summer Healthy Recipe : उन्हाळ्यात पाचनशक्ती स्ट्रॉग बनवायची आहे ? मग नाश्त्यात ट्राय करा ओट्स इडली, पाहा रेसिपी

सुती कपडे -

उन्हाळ्यात प्रवास करताना घाम येणे अपरिहार्य असते आणि घट्ट कपड्यांमुळे अंगावर पुरळ उठणे किंवा जळजळ होऊ शकते. संपूर्ण प्रवासात तुम्हाला त्रास सहन करायचा नसेल तर बॅगेत फक्त सुती आणि हलके कपडे ठेवा.

सनग्लासेस -

या ऋतूत उष्णतेचाही डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत पिशवीत सनग्लासेस ठेवायला विसरू नका. सनग्लासेस असण्याचा एक फायदा म्हणजे तो घातल्याने तुम्ही तुमचा लूक वाढवू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com