Makeup Tips For Garba Nights : गरबा नाइटला सेम टू सेम बॉलिवूड सेलिब्रिटींसारखं दिसाल! या मेकअप टिप्स फॉलो करा

Beauty Hacks : तुम्हाला अगदी कमी पैशांत अधिक सुंदर दिसायचे असेल तर आम्ही काही तुम्हाला सिंपल हॅक सांगणार आहोत
Makeup Tips For Garba Nights
Makeup Tips For Garba NightsSaam Tv
Published On

Makeup Tips :

नवरात्री उत्सव सुरु झाला असून सगळीकडे गरबा आणि दांडियाचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळत आहे. हल्ली प्रत्येकाला सुंदर दिसायचे असते. त्यासाठी चेहऱ्यावर आपण अनेक प्रकारची रंगरंगोटी करत असतो. परंतु, यासगळ्यात आपल्याला मॅच करायचे असते ते बॉलिवूड सेलिब्रिटींना.

नवरात्रीच्या काळात गरबा नाइटला आपल्याला दीपीका पादुकोण किंवा माधुरी दीक्षित सारखा लूक हवा असतो. त्यासाठी आपण महागड्या पार्लरमध्ये जाऊन पैसे देखील खर्च करतो. परंतु जर तुम्हाला अगदी कमी पैशांत अधिक सुंदर दिसायचे असेल तर आम्ही काही तुम्हाला सिंपल हॅक सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. प्राइमर वापरा

मेकअप (Makeup) करण्यापूर्वी तुमच्याकडे प्राइमर असणे आवश्यक आहे. प्राइमरमुळे तुमचा मेकअप जास्त काळ टिकण्यास मदत होतो.

2. चांगले उत्पादन वापरा

मेकअप करताना जितकी चांगले उत्पादन आपण वापरु तितकाच आपला चेहरा (Skin) अधिक सुंदर दिसेल. मेकअप करताना चेहऱ्यावर कोणतेही उत्पादने हाताने लावणे टाळा. यासाठी ब्रशचा वापर करा

Makeup Tips For Garba Nights
Buying Online Makeup Kit : ऑनलाइन मेकअप किट खरेदी करत आहात? 'या' चुका करू नका अन्यथा, चेहऱ्याचे सौंदर्य गमवाल !

3. लिपस्टिक

लिपस्टिकशिवाय तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य (Beauty) अपूर्ण आहे. जर तुम्ही डार्क आयशॅडो वापरत असाल तर लिपस्टिक हलक्या शेडची वापरा. जसे की पीच पिंक, न्यूड किंवा ऑरेंज या रंगाची लिपस्टिक लावा. पण जर आयशॅडो हलकी असेल तर लाल, मनुका अशी गडद आणि व्हायब्रंट लिपस्टिक शेड वापरा.

4. हेअरस्टाइल

गरबा खेळणार असाल तर ड्रेसनुसार तुमच्या केसांची हेअरस्टाईल करा. केस मोकळे सोडू नका.

Makeup Tips For Garba Nights
Sun Tanning Skin : ऑक्टोबर हिटमुळे त्वचेवर होतोय परिणाम? कशी घ्याल काळजी

5. ड्रेसला मॅचिंग आयशॅडो लावा

डोळे अधिक सुंदर दिसण्यासाठी ड्रेसला मॅच होईल असा आयशॅडो वापरा. जर अधिक काळ मेकअप टिकवायचा असेल तर क्रीम-आधारित आयशॅडो वापरुन पावडरही लावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com