Ganpati Decoration Ideas : गणपतीसाठी डेकोरेशन व पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, जाणून घ्या पूर्ण यादी

Ganesh Chaturthi Decoration : गणेशोत्सवात घरात बाप्पा बसवताना सजावट आणि पूजेचं सामान विशेष महत्वाचं असतं. सजावटीसाठी लाईट्स, फुलं, तोरण तर पूजेसाठी नारळ, दुर्वा, मोदक, नैवेद्य आवश्यक असतात.
Ganesh Chaturthi decoration
Ganpati decoration ideasgoogle
Published On

गणेशोत्सव म्हटलं की घराघरात आनंद, भक्ती आणि उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. बाप्पाच्या आगमनाची तयारी प्रत्येक भक्त खास पद्धतीने करतात . घरात गणपती बसवताना डेकोरेशन आणि पूजेचं सामान याला विशेष महत्व असतं. याची पुढे सविस्तर यादी आणि महत्वाच्या सामानांची नोंद केली आहे.

डेकोरेशनसाठी लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टी

गणपती डेकोरेशन साधं असो वा भव्य, त्यामध्ये काही वस्तू आवश्यक ठरतात. यामध्ये सजावटीसाठी रंगीबेरंगी लाईट्स, फुलं, रांगोळीचे रंग, वॉल हॅंगिंग, तोरण, डेकोरेटिव्ह पेपर्स, आर्टिफिशियल फ्लॉवर्स यांचा वापर होतो. काहीजण कापडी पडदे, मातीची सजावटीची वस्तू, नैसर्गिक फुले आणि पाने यांचा समावेश सुद्धा करतात.

Ganesh Chaturthi decoration
Gauri Ganpati : गौरी गणपतीत जुन्या साड्यांना द्या ट्रेंडी लूक

पूजेसाठी लागणारे महत्वाचे सामान

गणपती पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंमध्ये मूर्ती बसवण्यासाठीचे आसन, पाट, लाल किंवा पिवळा कपडा, पूजेची थाळी, नारळ, सुपारी, फुलं, दुर्वा, अगरबत्ती, उदबत्ती, तुपाचा दिवा, पंचामृत, नैवेद्य यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे गणपतीला आवडणारे मोदक, लाडू किंवा पेढे नैवेद्याला आवर्जून ठेवले जातात.

पूजेसाठी शंख, घंटा, कलश, कुंकू-हळद, तांदूळ, पान, हार हे साहित्य देखील महत्वाचं असतं. गणपती डेकोरेशन ही फक्त शोभेसाठी नसून ती भक्तीची एक पद्धत आहे. तर पूजेचं सामान पूर्ण असेल तर बाप्पाची पूजा नियमाने आणि भक्तिभावाने करता येते.

Ganesh Chaturthi decoration
Aadhar Card : खुशखबर! आता आधार अ‍ॅपवर क्षणात नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com