Sakshi Sunil Jadhav
सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सणांना आकर्षक कपडे खालायला हवे असतात.
महिलांना बऱ्याचदा एकदा नेसलेली साडी पुन्हा दुसऱ्या सणाला नेसावीशी वाटत नाही.
तुम्ही आता पैठणी किंवा काठापदराच्या साड्यांचे सुंदर आणि आकर्षक ड्रेस शिवू शकता.
तुमच्याकडे जर काढापदराची आणि नक्षीने भरलेली साडी असेल तर तुम्ही त्यांचा सुंदर ड्रेस शिवून घेऊ शकता. त्याची ओढणी तुम्हाला अधिक आकर्षक दिसेल.
तुमच्याकडे जर प्लेन काढापदराची साडी असेल आणि तुम्हाला गौरीगणपतीला कमी नटून अधिक आकर्षक दिसायचं असेल तर हा ड्रेस बेस्ट आहे.
तुमच्याकडे विविध रंगाच्या साड्या असतील तर तुम्ही त्याचे छोटे ट्रेंडी वनपीस शिवून घेऊ शकता.
तुमच्याकडे गडद रंगाचा ड्रेस असेल तर लॉंग वनपीस आणि थोडा तमीळ लूक बेस्ट ठरेल.
तुम्हाला खूप जड गच्च भरलेले ड्रेस आवडत नसतील तर तुम्ही हलक्या साड्यांचे चुडीदार, पटीयाला अशा पद्धतीचे ड्रेस शिवून वापरु शकता. पैठणी साडीचे ड्रेस हे सणासुदींसाठी खूप बेस्ट ठरतात.