Ganapati Celebration Across India : विविधतेत एकता! भारतातील विविध राज्यांत 'या' पद्धतीने साजरे होतात गणेशोत्सव

India all state ganpati celebration : भारतातील विविध राज्यांत कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो याची माहिती जाणून घेणार आहोत.
India all state ganpati celebration
Ganapati Celebration Across IndiaSaam TV
Published On

राज्यात सध्या मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. प्रत्येक व्यक्ती गणरायाच्या सेवेत तल्लीन झाला आहे. देवाची मनोभावे सेवा करताना प्रत्येक व्यक्ती आपल्या गावात किंवा शहरात असलेल्या पद्धतीनुसार पुजा करतात. आपल्या भारतात देखील विविध राज्यांत विविध पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतो. इतकेच नाही तर विविध राज्यांत गणेशोत्सवाला वेगवेगळी नावे सुद्धा आहेत. त्याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.

तामिळनाडू

तामिळनाडू राज्यात गणेश चतुर्थी पिलाया चतुर्थी या नावाने साजरी केली जाते. येथे नैवेद्यात पोंगल आणि पायसम खाल्ले जाते. बाप्पाची मनोभावे सेवा करून विसर्जन झाल्यावर येथील नागरिक मूर्तीची माती पुन्हा घरी घेऊन येतात. ही माती ते आपल्या शेतात लावतात.

कर्नाटक

कर्नाटकातील गणेशोत्सव सर्वात जास्त इकोफ्रेंडली असतो. येथे बाप्पाची मूर्ती संपूर्ण मातीपासूनच बनवली जाते. तसेच येथे वापरण्यात येणारे डेकोरेशनचे साहित्य देखील अशाच पद्धतीने बनवले जाते. येथे गणेश चतुर्थी साजरी करताना त्याला विनायका चतुर्थी असं म्हटलं जातं.

India all state ganpati celebration
Ganesh Utsav 2022 : गणेशाेत्सव मंडळांसाठी आनंदाची बातमी; सांगलीत झाला महत्वपुर्ण निर्णय

केरळ

केरळमध्ये सुद्धा गणेशोत्सव सुरू असताना बाप्पाला साजूक तुपातील शिऱ्याचा नैवेद्य दिला जातो. केरळमधील गणेशोत्सवाचे नाव लंबोदरा पुजा असे आहे. लंबोदरा पुजा करताना बाप्पाला खुश करण्यासाठी कथ्थकली डान्स केला जातो.

गोवा

गोव्यात देखील अगदी उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. येथे छोवोत चतुर्थी म्हणून या सणाला ओळखलं जातं. या उत्सवात गणपती बाप्पासह गौरीची देखील पुजा केली जाते. गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे गणपती बाप्पा आणि गौराई एकत्र येतात.

आंध्रप्रदेश आणि तेलंगणा

आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये सुद्धा गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. येथे गणेश चतुर्थी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. विघ्नहर्ता देव असल्याने या उत्सवात बाप्पाजवळ आपल्या जीवनातील सर्व दु:ख आणि व्यथा मांडल्या जातत.

हैदराबाद

हैदराबाद शहरात खैराथाबाद गणेश फार प्रसिद्ध आहे. अनेक व्यक्ती या बाप्पाला नवसाला पावणारा गणपती असं सुद्धा म्हणतात. हैदराबादमधील बाप्पाच्या दर्शनाला दरवर्षी भाविक मोठी गर्दी करतात.

गुजरात

गुजरातमध्ये गणेशोत्सवाला विशेष महत्व आहे. येथील वडोदरामध्ये बाप्पाच्या आगमनासह विसर्जनाची भव्य दिव्य अशी रॅली काढली जाते. यामध्ये ढोल ताशांचा नाद घुमत असतो. ढोल ताशांच्या आवाजात प्रत्येक व्यक्ती नाचत नाचत बाप्पाचं स्वागत करतो. दूध आणि श्रिखंडाचा नैवेद्य दिला जातो.

मध्य प्रदेश

भोपाळमध्ये गणेश चतुर्थी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी केली जाते. यामध्ये बाप्पाची मूर्ती धान्यांपासून बनवली जाते. मूर्तीमध्ये एकही गोष्ट अविघटनशील नसते. सर्व वस्तू पर्यावरण पुरकच वापरल्या जातात.

राजस्थान

राजस्थानमधील गणेशोत्सवात मोटीडुंगरी मंदिराची शोभा पाहून स्वर्गात आल्यासारखे भासते. येथे बाप्पाची सेवा करत त्यासाठी घेवर या मिठाईचा खास प्रसाद दिला जातो.

ओडिसा, वेस्ट बंगाल आणि आसाम

ओडिसा, वेस्ट बंगाल आणि आसाम येथे गणेशोत्सव एकाच पद्धतीने साजरा होतो. या गणेशोत्सवात बाप्पाला नेहमी रसगुल्ला खाण्यासाठी दिला जातो. गणरायासाठी बनवल्या जाणाऱ्या नैवेद्यात विविध पद्धतीचे रसगुल्ले दिले जातात.

महाराष्ट्र

गणेशोत्सवाचा जल्लोष आणि मोठा उत्सव महाराष्ट्रातच होतो. मुंबईमध्ये लालबागचा राजा आणि सिद्धिविनायक मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होतात. गणेशोत्सवात प्रत्येक घरात मोदक आणि पुरळ पोळी बनवली जाते.

India all state ganpati celebration
Ganesh Utsav : सावधान! POP ची मूर्ती स्थापन केल्यास होणार कारवाई, मंडळाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना बसणार दणका; न्यायालयाचे आदेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com