Yawning Heart Attack: वारंवार जांभई येणं हार्ट अटॅकचं असू शकतं लक्षण, तज्ज्ञांनी सांगितली संपूर्ण माहिती

Yawning Symptoms : वारंवार जांभई येणं हे फक्त थकव्याचं लक्षण नाही. तज्ज्ञांच्या मते, हे हृदयावर ताण येण्याचं किंवा हार्ट अटॅकचं सुरुवातीचं संकेत असू शकतं.
frequent yawning causes
yawning heart attackgoogle
Published On
Summary

वारंवार जांभई येत असल्यास दुर्लक्ष करु नका.

ब्रेनस्टेममुळे ह्दयाची गती आणि रक्तप्रवाह नियंत्रित राहतो.

थकवा नसतानाही जास्त जांभया येत असतील तर तुम्हाला गंभीर आजार होण्याची शक्यता जास्त असते.

आपण सर्वसाधारणपणे जांभईला थकवा किंवा कमी झोपेचे लक्षण समजतो. पण काही वेळा ही साधी सवय शरीराच्या मदतीची शांत हाक असू शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. नुकत्यात केलेल्या संशोधनानुसार, झोपेशी काहीही संबंध नसलेली सतत येणारी जांभई काही वेळा हृदयावर होणाऱ्या ताणाशी किंवा सुरू असलेल्या हृदयविकाराच्या लक्षणांशी जोडलेली असू शकतात.

तज्ज्ञ सांगतात की जांभई येणं ही फक्त झोपेची क्रिया नाही. ती मेंदूच्या ब्रेनस्टेम या भागातून नियंत्रित केली जाते. हाच भाग आपल्या शरीरातील महत्त्वाच्या प्रक्रिया म्हणजे हृदयाची गती, श्वसन आणि रक्तप्रवाह नियंत्रित करत असतो. त्यामुळे जेव्हा हृदयावर ताण येतो किंवा रक्तपुरवठा नीट होत नाही, तेव्हा ब्रेनस्टेम मेंदू थंड करण्यासाठी आणि तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जांभई घेण्याची प्रतिक्रिया देऊ शकतो.

frequent yawning causes
Hair Fall Tips: केस गळतीमागचं खरं कारण काय? तज्ज्ञ सांगतात या सवयी लगेचच थांबवा, नाहीतर...

MedlinePlus च्या मते, जास्त प्रमाणात जांभई घेणं काही वेळा vagal response म्हणजेच हृदयाचे ठोके आणि रक्तदाब अचानक कमी होण्याशी संबंधित असू शकतं. हा प्रतिसाद हृदयातील अनियमितता किंवा बेशुद्धीपूर्वी दिसू शकतो आणि काही वेळा हार्ट अटॅक येण्यापूर्वीही शरीर असं संकेत देतं. जर जांभई येताना तुम्ही थकलेले नसाल, तरीही वारंवार जांभई येत असेल तर ते लक्ष देण्यासारखं आहे. हृदयतज्ज्ञांच्या मते, अशी जांभई जर चक्कर, मळमळ, घाम, छातीत अस्वस्थता अशा लक्षणांसोबत दिसली, तर हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे vagus nerve सक्रिय होत असल्याचं संकेत असू शकतं.

जांभई येणं हे मेंदू थंड ठेवण्याचा एक उपाय असू शकतो. हृदय जेव्हा तापमान आणि ऑक्सिजन नियंत्रण योग्यरीत्या करू शकत नाही, तेव्हा शरीर सतत जांभई घेऊन संतुलन साधण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे वारंवार जांभई येणं हे हृदयाच्या कार्यक्षमतेशी थेट जोडलेलं असू शकतं. नक्कीच, प्रत्येक वेळी येणारी जांभई ही हृदयविकाराचं चिन्ह नसते. पण जर ती सतत येत असेल आणि त्यासोबत छातीत ताण, थंड घाम, डोके हलके होणं किंवा मळमळ अशी लक्षणं दिसत असतील, तर तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे.

frequent yawning causes
Diwali 2025: फराळ नरम पडतोय? मग सोप्या टिप्स लगेचच करा फॉलो, महिनाभर टिकतील चकल्या अन् चिवडा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com