

छठ पूजा हा सण एकूण ४ दिवस साजरा केला जातो.
छठ पुजा ही २५ ते २८ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरी केली जाते.
सूर्यदेव आणि छठी माई यांच्या पूजेने कुटुंबाला आरोग्य व समृद्धी मिळावी यासाठी ही उपासना केली जाते.
हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि शुद्धतेचे प्रतीक मानला जाणारा छठ महापर्व यंदा 25 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होत आहे. हा चार दिवस चालणारा व्रताचा सण फक्त उपवासाचा नाही, तर श्रद्धा, संयम आणि निसर्गपूजेचा उत्सव आहे. बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालात हा सण अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. या पर्वात सूर्यदेव आणि छठी माई (छठी मय्या) यांची उपासना केली जाते. व्रत धरणाऱ्या स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या सुख, समृद्धी आणि पुत्रांच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात.
या वर्षी छठ पुजेचा पहिला दिवस २५ ऑक्टोबर, शनिवार रोजी असून, शेवटचा दिवस २८ ऑक्टोबर, मंगळवार रोजी पार पडेल. चार दिवस चालणाऱ्या या पर्वात प्रत्येक दिवसाचे खास धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.
पहिला दिवस म्हणजे नहाय-खाय (Nahay Khay). या दिवशी स्त्रिया पवित्र नदीत स्नान करून छठ पर्वाची सुरुवात करतात. या दिवशी सूर्योदय सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी होईल, तर सूर्यास्त सायंकाळी ५ वाजून ४२ मिनिटांनी होईल.
दुसरा दिवस म्हणजे खरना (Kharna), ज्याला लोहंडा असेही म्हणतात. या दिवशी स्त्रिया दिवसभर निर्जळ उपवास करतात आणि संध्याकाळी मातीच्या चुलीवर आंब्याच्या लाकडाने गूळाची खीर (रसिया) आणि तुपाने बनवलेली रोटी तयार करतात.
तिसरा दिवस म्हणजे संध्याअर्घ्य (Sandhya Arghya), जो छठ पर्वातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी दिवसभर निर्जळ उपवास करुन संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी नदी, तलाव किंवा घाटावर स्नान करून अस्ताला जाणाऱ्या सूर्याला अर्घ्य देतात. या वर्षी सूर्यास्ताचा वेळ सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी आहे.
चौथा आणि अंतिम दिवस म्हणजे ऊषाअर्घ्य (Usha Arghya). या दिवशी स्त्रिया उगवत्या सूर्यदेवाला अर्घ्य देतात. सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सूर्योदय होईल. अर्घ्य दिल्यानंतर ३६ तासांचा कठोर व्रत समाप्त होतो आणि त्यानंतर प्रसाद खाऊन व्रत सोडला जातो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.