Post Diwali Care: दिवाळीनंतर खूप थकवा अन् चेहरा डल दिसतोय? मग हे सोपे उपाय ठरतील बेस्ट

Skin Glow Tips: दिवाळीनंतर थकवा आणि त्वचेचा निस्तेजपणा जाणवतोय? काही सोपे घरगुती उपाय करून काही दिवसांतच पुन्हा मिळवा ग्लोइंग, तजेलदार आणि फ्रेश चेहरा.
Post-Diwali Skin Care Tips
Post-Diwali Skin Care Tipsgoogle
Published On

दिवाळीचे काही दिवस म्हणजे प्रचंड गडबडीचे असतात. फॅमिलीसोबत वेळ घालवणे, फराळ, फटाके, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या आणि गप्पांची धमाल सुरु असते. पण या सगळ्यानंतर शरीर आणि त्वचा दोन्ही थकून जातात. डोळ्यांखाली काळी वर्तुळे, स्कीन डलनेस आणि थकलेली भावना जाणवू लागते. पण काळजी करू नका, तुमचा ग्लो पुन्हा आणणे अजिबात अवघड नाही. काही सोपे आणि नैसर्गिक उपाय केल्यास काही दिवसांतच तुम्ही पुन्हा ताजेतवाने आणि उत्साही दिसू शकता.

पुरेसे पाणी प्या

दिवाळीनंतर मिठाई आणि फराळामुळे शरीरात साखर आणि मिठाचे प्रमाण वाढते. यामुळे त्वचा फुगलेली आणि कोरडी दिसते. दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा किंवा काकडीचा तुकडा घालून प्या. दिवसाला किमान २ ते ३ लिटर पाणी, हर्बल टी, नारळपाणी किंवा तुळशी-मिंट असलेले डिटॉक्स ड्रिंक घ्या. यामुळे त्वचेला आणि शरीराला आवश्यक ओलावा परत मिळतो.

Post-Diwali Skin Care Tips
Soft Chapati Tips: मऊ अन् फुलणारी चपाती बनवण्याचे सोपे घरगुती उपाय

त्वचेला साखरेपासून सुट्टी द्या

दिवाळीच्या गोडधोडानंतर काही दिवस साखर टाळा. रिफाइन्ड साखर त्वचेवर सुरकुत्या येऊ शकतात आणि इन्फ्लेमेशन वाढवते. साखरेऐवजी फळे, खजूर किंवा मधाचा वापर करा. काही दिवसांतच त्वचेतील तजेला आणि मऊपणा परत येतो.

त्वचेला श्वास घेऊ द्या

दिवाळीमध्ये मेकअप, धूळ, प्रदूषण आणि जागरणामुळे त्वचेचे छिद्र बंद होतात. काही दिवस मेकअप टाळा आणि सौम्य फेस वॉशने चेहरा धुवा. आठवड्यातून दोनदा हलका एक्सफोलिएटर वापरा. त्यानंतर अ‍ॅलोव्हेरा जेल किंवा हायड्रेटिंग शीट मास्क लावा. रात्री हलक्या सिरम किंवा फेस ऑइलने मसाज करा.

योग्य झोप घ्या

रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या गाठीभेटीनंतर आता शरीराला विश्रांती द्या. एक आठवडा तरी लवकर झोपण्याची सवय लावा. झोपण्यापूर्वी मोबाईल बाजूला ठेवा, दिवे मंद करा आणि मन शांत ठेवा. पुरेशी झोप घेतल्याने डोळ्यांचा तेज वाढतो, त्वचा उजळते आणि मन प्रसन्न राहते.

थोडी हालचाल करा

दिवाळीचे गोडधोड आता व्यायामाने संतुलित करा. सकाळी जलद चालणे, योगा किंवा थोडं स्ट्रेचिंग शरीरातील रक्तप्रवाह वाढवते आणि टॉक्सिन्स बाहेर टाकते. नियमित हालचालीमुळे केवळ शरीर तंदुरुस्त राहत नाही तर त्वचेलाही नैसर्गिक तजेला मिळतो. सणानंतरची थकवा कमी करण्यासाठी हे काही छोटे बदल पुरेसे आहेत.

Post-Diwali Skin Care Tips
Bhaubeej 2025 : या वेळेत भाऊबीज करणं टाळा, वाचा राहुकाळा मुहूर्त आणि ओवाळणीच्या टिप्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com