Weight Loss Tips : आजच्या काळातील मानवी जीवन हे वेगवान झाले आहे. त्यामुळे आरोग्यावर दुर्लक्ष होत आहे. हार्टअटॅक, हाय ब्लड प्रेशर आणि मधुमेह यासारखे गंभीर आजार होतात. या आजारांच्या सुरुवातीचे लक्षणांमध्ये लठ्ठपणा हे प्रमुख लक्षण आहे.
लठ्ठपणा वाढल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता विशेष काळजी घेणे गरजेचे असते. आपण हे विसरता काम नये आरोग्य हेच खरी संपदा आहे. त्यामुळे आज आम्ही लठ्ठपणा यावर एक वेगळा आणि सोपा उपाय शोधला आहे. त्यासाठी तुम्हाला दररोज सफचंदाचे सेवन करून लठ्ठपणावर नियत्रंण मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया ५ दिवसांचा ऍपल डाएट (Diet) प्लानविषयी माहिती.
1. पहिला दिवस
पहिल्या दिवशी सकाळचा नाश्तयामध्ये दोन ऍपल आणि दुपारच्या जेवणामध्ये एक ऍपल तसेच रात्रीच्या जेवणामध्ये तीन ऍपलचा (Apple) समावेश करा.
2. दुसरा दिवस
तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी एक ग्लास सोया मिल्क (Milk) सोबत एक ऍपल आणि दुपारच्या जेवणामध्ये एक ऍपल, सलाद आणि २ गाजर त्यांनतर रात्री केवळ २ ऍपल खायचे आहेत.
3. तिसऱ्या दिवशी
तिसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात 1 सफरचंद, 1 स्लाईस मल्टीग्रेन ब्रेड आणि उकडलेले अंडी खायची आहेत. त्यानंतर दुपारच्या जेवणात 1 सफरचंद, काकडी, टोमॅटो, कांदा आणि मीठ असलेले बंगालग्रॅम सॅलडचा समावेश करा आणि रात्रीच्या जेवणासाठी ब्रोकोली,गाजर 1 सफरचंद आणि मसूर सूप
4. चौथा दिवस
सकाळच्या नाश्त्यात एक ऍपल. दुपारच्या जेवणात ग्रीड वेजी सोबत एक ऍपल आणि रात्री बीटसोबत एक ऍपलचा समावेश करा.
5. पाचवा दिवस
सकाळी एक ऍपल आणि अंडी त्यानंतर दुपारच्या जेवणात ग्रीड वेजी सोबत एक ऍपल आणि रात्री ग्रीन टी सोबत एक ऍपलचा समावेश करा.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.