Office Colleague Relations : सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध टिकवून ठेवण्यासाठी 'या' 5 टिप्स फॉलो करा

office colleague maintaining balance : तुम्ही ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत चांगले नाते निर्माण करण्याच्या प्रयत्न करत असाल तर केवळ या 5 सोप्या टीप्सचे पालन करा
Office Colleague Relations
Office Colleague RelationsSaam Tv

Relationship With Coworkers : ऑफिसमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध ठेवणे  गरजेचे आहे. खरेतर प्रत्येकाला सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध ठेवायला आवडते. परंतु सर्वांना ते शक्य नसते, भरपूर प्रयत्न करूनही काही लोक सहकाऱ्यांना इम्प्रेस करू शकत नाहीत.

तुमच्यासोबतही असे होत असेल आणि तुम्ही ऑफिसमधील (Office) सहकाऱ्यांसोबत चांगले नाते निर्माण करण्याच्या प्रयत्न करत असाल तर केवळ या 5 सोप्या टीप्सचे (Tips) पालन करा. त्यामुळे काही दिवसांत तुमचे सहकाऱ्यांसोबतचे नाते पूर्वीपेक्षा अधिक चांगले होऊ शकते. त्यामुळे तुमचा वर्कलोड कमी होतो आणि कठीण कामांना सामोरे जाणे ही सोपे होते.

Office Colleague Relations
Office Going Tips for Working Women : वर्किंग वूमन असणाऱ्यांनी बॅगेत ठेवायला हव्या 'या' 7 गोष्टी, जीवन होईल सुरळीत

1. चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवा

चेहऱ्यावर हास्य असणे गरजेचे आहे कारण चेहऱ्यावरील हास्य तुमचा सकारात्मक दृष्टिकोन दर्शवत असतो. परिणामी लोक तुमच्याकडे सहज आकर्षित होतात. त्यामुळे ऑफिस मधील सहकाऱ्यांसोबत बोलताना नेहमी  चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवा.

2. सहकाऱ्यांचे ऐका

काही लोक ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत पूर्णपणे दुर्लक्ष करतात, सहकार्यांनाही तुमच्यापासून तुटल्यासारखे वाटू लागते त्यामुळे अशा परिस्थितीत सहकार्यचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासोबतच सहकाऱ्यांच्या बाबीला महत्त्व दिले गेले तर  सहज तुमच्यातील संबंध सुधारतील.

Office Colleague Relations
Working Women Health Care Tips : वर्किंग वूमने नियमित फॉलो करा या हेल्थकेअर टिप्स, नेहमी राहाल तंदुरुस्त

3. टी ब्रेकवर जा

ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत मजबूत संबंध निर्माण करण्यासाठी टी ब्रेक मध्ये तुम्ही त्यांच्यासोबत चहा किंवा कॉफी (Coffee) प्यायला जाऊ शकता.  नेहमी असे करण्याची गरज नाही, परंतु आठवड्यातून एक किंवा दोनदा तुम्ही तुमच्या सहकार्यांसोबत टी ब्रेक वर जाणे गरजेचे आहे.

4. शो ऑफ करू नका

काही लोक सहकार्याला प्रभावित करण्यासाठी अनेक वेळा शो ऑफ करतात. अशा परिस्थितीत सहकारी तुम्हाला महत्व देत नाहीत. त्यामुळे सहकाऱ्यांसमोर समोर खोटे बोलणे ऐवजी खरे बनण्याचा प्रयत्न करा यामुळे सहकार्य आणि तुमच्यातील बॉण्डिंग चांगले रहाते.

Office Colleague Relations
Relationship Tips : तुमचाही जोडीदार प्रेमात असल्याचे नाटक करत आहे का? कसे कळेल? जाणून घ्या

5. लंच सोबत करा

अनेक लोकांना ऑफिस दरम्यान एकटे बसून लंच करायला आवडते. मात्र सहकाऱ्यांशी मैत्री वाढवण्यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत लंच करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे सहकाऱ्यांसोबतचे नाते चांगले राहते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com