Eye Exercises : दिवसभर लॅपटॉपवर काम केल्याने डोळ्यांवरील ताण वाढलाय? 'या' टिप्सने अख्ख जग लख्ख दिसेल

Eye Fitness Tips : डोळे दुखत असतील आणि त्यावर ताण येत असेल तर तुम्ही दररोज या ट्रिक्स फॉलो करणे महत्वाचे आहे. याने तुमच्या डोळ्यांच्या सर्व समस्या दूर होतील.
Eye Fitness Tips
Eye ExercisesSaam TV
Published On

सध्याच्या युगात प्रत्येक व्यक्ती लॅपटॉप आणि कंप्युटरवर काम करतात. स्क्रिनवर असलेली लाइट आपल्या डोळ्यांची दृष्टी कमी करते. दृष्टी पुसट झाली की आपल्याला समोरचं सर्वकाही अंधुक दिसू लागतं. तसेच डोळ्यांवर ताण आणखी जास्त वाढत जातो. आता तुमचे डोळे देखील सतत दुखत असतील आणि त्यामुळे डोकं देखील दुखत असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा.

Eye Fitness Tips
Neha Sharma Fitness: 36 वर्षांच्या नेहा शर्माच्या फिटनेस अन् सौंदर्याचं गुपित काय?

डोळ्यांची उघडझाप करा

काम करताना आपलं पूर्ण लक्ष स्क्रिनवर असतं. त्यामुळे डोळे दुखू लागतात. असे होत असल्यास अधुनमधून २० सेकंदाचा ब्रेक घ्या. ब्रेक घेतल्यावर डोळ्यांची उघडझाप करत राहा. यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो आणि डोळे दुखणे कमी होतं.

२० सेकंदाचा ब्रेक

डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी कामामध्ये प्रत्येक १ किंवा आर्ध्या तासाने २० सेकंदांचा ब्रेक घ्या. ब्रेक घेतल्याने डोळ्यांची एक्सरसाइज करा. तसेच स्क्रिन न पाहता अन्य काही वस्तू पाहत राहा. यामध्ये तुम्ही डेस्कवर एक झाड ठेवा आणि त्याकडे पाहत राहा. असे केल्याने डोळ्यांचा त्रास कमी होईल.

हाताने डोळ्यावर मसाज करा

जेव्हा तुमचे डोळे दुखण्यास सुरुवात होईल त्यावेळी डोळ्यांना हाताने मसाज करा. हाताची बोटे डोळ्यांवर फिरवून घ्या. तसेच कपाळावर देखील बोटांनी मसाज करा. असे केल्याने देखील तुम्हाला होणारा त्रास मोठ्याप्रमाणात कमी होईल.

डोळे चारही बाजून फिरवा

काम करताना एक तासानंतर डोळे चारही बाजून फिरवा. डोळे फिरवताना आधी डोळे बंद करा आणि मग सर्वत्र फिरवा. ही ट्रिक तुम्हाला १० वेळा फॉलो करायची आहे. यामुळे हळू हळू तुमच्या डोळ्यांवरील चष्मा गायब होईल.

Eye Fitness Tips
Fitness Tips: नियमित करा या 2 गोष्टी, पोटाचा घेर होईल कमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com