Stomach Health : सणासुदीत गोडाचे पदार्थ खा-खा खाल्ले? कशी घ्याल पोटाची काळजी

How To Improve Gut Health festive season : आपली पचनसंस्था चांगले पचन, पोषक तत्वांचे शोषण आणि रोगप्रतिकारशक्तीचे कार्य यामध्ये अधिक महत्त्वाची भूमिका बजावते.
Stomach Health
Stomach Health Saam Tv

Healthier Gut :

गणपती बाप्पा मोरया... म्हणत तुम्ही देखील गोडाच्या पदार्थावर ताव मारला असेलच. त्यामुळे पोटात गडबड झालीये काय करावं सुचत नाहीये? तर जरा थांबा. पोटाचे आरोग्य राखणे आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

आपली पचनसंस्था चांगले पचन, पोषक तत्वांचे शोषण आणि रोगप्रतिकारशक्तीचे कार्य यामध्ये अधिक महत्त्वाची भूमिका बजावते. बरेचदा पोट बिघडण्याचे सर्वात मोठे कारणं खराब जीवनशैली ज्याचा परिणाम आपल्या पोटाच्या आरोग्यावर होतो. जर तुम्हालाही तुमचे पोट निरोगी ठेवायचे असेल तर या चुका टाळा.

Stomach Health
Best Couple Spots In Pune: पुण्यातील बेस्ट रोमँटीक कपल्स स्पॉट, प्रेमीयुगुलांसाठी स्वर्गच जणू

1. चुकीचे खाण-पाण निवडणे

सण आले म्हटलं की, गोडाचे पदार्थ आपण अतिरिक्त प्रमाणात खातो. ज्याचा आपल्या सर्वात आधी परिणाम पचन संस्थेवर होतो. जर तुमचे ही पोट बिघडले असेल तर संतुलित आहार घ्या. तुमच्या आहारात फळे, भाज्या, कडधान्य, प्रथिने आणि आंबवलेले पदार्थ यांचा समावेश करा.

2. फायबरचा अभाव

बिघडलेल्या पोटाचे आरोग्य राखण्यासाठी फायबर अधिक महत्त्वाचे मानले जाते. ज्यामुळे आतड्याची हालचाल आणि बद्धकोष्ठता सुधारण्यास मदत होते. याशिवाय पोटात असलेले चांगले बॅक्टेरिया वाढवण्याचे काम करते. यासाठी तुम्ही आहारात धान्य, कडधान्ये, फळे आणि भाज्यांचे सेवन करा.

3. हायड्रेशन

पोटाचे (Stomach) आरोग्य बिघडते ते डिहायड्रेशनमुळे (Dehydration). शरीरातील पाणी कमी झाले की, बध्दकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्या दिवसभरात किमान 8 ग्लास पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

Stomach Health
Dandruff Problem In Hair : केसात कोंडा झालाय, सतत खाज सुटतेय? स्वयंपाकघरातील हे पदार्थ ठरतील गुणकारी

4. पुरेशी झोप घ्या

पुरेशी झोप (Sleep) न घेतल्यामुळे पोटाच्या आरोग्यावर परिणाम होतो. ज्यामुळे पोटातील बॅक्टेरियाचे संतुलन बिघडते. यासाठी ७ ते ९ तासांची पूर्णपणे झोप घेणे महत्त्वाचे आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com