Home Loan Offer : वाढत्या व्याजानुसार 'या' बँकेने केले कर्ज स्वस्त, आता कमी दरात मिळणार !

पण नुकत्याच दिवाळीसाठी या बँकाने गृहकर्जात सवलती देण्याचे ठरवले आहे.
Home Loan Offer
Home Loan OfferSaam Tv
Published On

Home Loan Offer : आजच्या काळात घर घेणे सोपे नाही त्यात कर्ज काढून घर घ्यायचे असल्यास अनेक गोष्टी पाहाव्या लागतात. पण नुकत्याच दिवाळीसाठी या बँकाने (Bank) गृहकर्जात सवलती देण्याचे ठरवले आहे.

सरकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) ने रविवारी सणासुदीच्या सवलतीचा भाग म्हणून गृहकर्जावरील व्याजदर आठ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली. ही बँक सध्या ८.३ टक्के दराने गृहकर्ज देते. गृहकर्जाचे दर कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असतात.

Home Loan Offer
Home Loan: SBI चे गृहकर्ज महागले; FD च्या व्याजदरातही वाढ

ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर जितका जास्त असेल तितके बँकांकडून कर्ज देणे सोपे जाते. शिवाय, कर्जाच्या दरातही सूट दिली जाते. अलीकडेच SBI ने सणासुदीच्या काळात गृहकर्जाच्या दरात सूट जाहीर केली होती. SBI कर्ज देखील क्रेडिट स्कोअरवर आधारित आहे.

दुसरीकडे, पुणे मुख्यालयातील बँक ऑफ महाराष्ट्रनेही वैयक्तिक कर्जावरील व्याजदर सध्याच्या 11.35 टक्क्यांवरून 8.9 टक्के कमी करण्याची घोषणा केली आहे. नवीन दर सोमवारपासून (17 ऑक्टोबर 2022) लागू झाले आहेत. बँकेने यापूर्वीच 'दिवाळी (Diwali) धमाका' ऑफर अंतर्गत गृह कर्ज आणि कार कर्जासाठी प्रक्रिया शुल्क माफ केले आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफर

गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्जासाठी बँकेने बँकिंग उद्योगातील सर्वात कमी व्याजदरांपैकी एक देखील देऊ केला आहे. वाढत्या धोरणात्मक दरांच्या पार्श्वभूमीवर, बँक ऑफ महाराष्ट्रच्या एका निवेदनात म्हटले आहे. व्याजदर वाढत आहेत. अशा वेळी, BoM ग्राहकांमध्ये आनंद आणण्यासाठी सणासुदीच्या काळात किरकोळ कर्ज स्वस्त करत आहे.

यापूर्वी देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियानेही सणासुदीच्या काळात ग्राहकांना स्वस्त कर्जाचा लाभ देण्याची घोषणा केली होती. घोषणेनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया होम लोनवर 15 बेस पॉइंट्स ते 30 बेस पॉइंट्सची सूट देत आहे. स्टेट बँकेची ही नवीन ऑफर 4 ऑक्टोबरपासून लागू होणार असून ती 31 जानेवारी 2023 पर्यंत चालणार आहे. स्टेट बँकेचा सामान्य गृहकर्ज दर 8.55 टक्क्यांपासून सुरू होतो आणि 9.05 टक्क्यांपर्यंत जातो. पण सणासुदीच्या ऑफरअंतर्गत हा दर 8.40 टक्क्यांवरून 9.05 टक्के करण्यात आला आहे.

Home Loan Offer
Liver Health : यकृताचे आरोग्य जपायचे आहे ? या पदार्थांचे आहारात सेवन करा

SBI देखील डिस्काउंट ऑफर चालवत आहे

स्टेट बँकेच्या विधानानुसार, नवीन गृहकर्ज ऑफरमध्ये नियमित आणि टॉप अप कर्जांवर कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. तथापि, ग्राहकांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की स्वस्त गृहकर्ज आणि कमी EMI चा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे चांगला CIBIL स्कोर असावा. जर CIBIL स्कोर चांगला नसेल तर स्वस्त गृहकर्जाचा लाभ मिळणार नाही.

वाढती महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक रेपो दरात वाढ करत आहे. डिसेंबरमध्ये रेपो दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. या दरात वाढ झाल्याने कर्ज महाग होते. याचा सर्वाधिक परिणाम गृहकर्जावर होत आहे. रेपो रेट वाढल्याने अनेक वेळा गृहकर्जाचे दर वाढले आहेत. त्यानुसार सर्व बँकांनी कर्जदरात वाढ केली आहे. दरम्यान, काही बँका अशा आहेत ज्या सणासुदीच्या काळात ग्राहकांना स्वस्तात कर्ज देत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com