SBI Increase Home Loan Rate Latest  Update
SBI Increase Home Loan Rate Latest UpdateSAAM TV

Home Loan: SBI चे गृहकर्ज महागले; FD च्या व्याजदरातही वाढ

स्टेट बँक ऑफ इंडिया या देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने Home Loan चे व्याजदर वाढवले आहेत.

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने (SBI) गृहकर्जाच्या (Home Loan) व्याजदारात वाढ केली आहे. गृहकर्जाचे नवे दर बुधवारी, १५ जूनपासून लागू झाले आहेत. बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट अर्थात एमसीएलआर (MCLR) मध्ये ०.२० बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. नवे दर १५ जूनपासून लागू झाले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये ५० बेसिस पॉइंट्सची वाढ केल्यानंतर एसबीआयने हा निर्णय घेतला आहे.

SBI Increase Home Loan Rate Latest  Update
बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; बँका उघडण्याची वेळ बदलली, जाणून घ्या डिटेल्स

एका रिपोर्टनुसार, एसबीआयने गृहकर्जावरील किमान व्याजदर ७.५५ टक्के केला आहे. ज्यांचा सीआयबीआयएल अर्थात (CIBIL Score) ८०० पेक्षा अधिक असलेल्या लोकांनाच ७.५५ टक्के व्याजदराने गृहकर्ज मिळेल. ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर ७५०-७९९ या दरम्यान आहे, अशांना ७.६५ टक्के वार्षिक दराने गृहकर्ज मिळणार आहे. (Home Loan)

त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर ७०० ते ७४९ या दरम्यान आहे, अशांना ७.७५ टक्के आणि ६५०-६९९ सिबिल स्कोर असलेल्यांना ७.८५ टक्के व्याजदराने एसबीआयकडून गृहकर्ज देण्यात येईल. तसेच ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर ५५० ते ६४९ या दरम्यान असेल अशा व्यक्तींना ८.०५ टक्के व्याजदराने गृहकर्ज मिळेल.

SBI Increase Home Loan Rate Latest  Update
घराचं स्वप्न 'सहकारा'तून...; सहकारी बँकांच्या होम लोनबाबत RBI चा मोठा निर्णय

एमसीएलआरमध्ये वाढ

बँकेने एका वर्षांचा बेंचमार्क एमसीएलआर सुद्धा ७.२० टक्क्यांवरून वाढवून ७.४० टक्के केला आहे. वाहन, गृह आणि वैयक्तिक कर्ज एमसीएलआरशी जोडलेला आहे. त्यामुळे रेपो रेटमध्ये बदल झाल्यानंतर यामध्येही बदल केला जातो. एसबीआयने रेपो रेट लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) सुद्धा १५ जूनपासून वाढवलेला आहे. यापूर्वी आरएलएलआर ६.६५ टक्के होता. त्यात वाढ करून आता ७.१५ टक्के इतका करण्यात आला आहे. वाढवण्यात आलेले नवे दर १५ जूनपासून लागू झालेले आहेत.

एफडीच्या व्याजदरांतही केली वाढ

SBI ने १४ जून रोजी दोन कोटी रुपयांपेक्षा कमी आणि २११ दिवसांपासून ते ३ वर्षे या कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या मुदत ठेवींवरील (fixed deposit) व्याजदरांमध्ये बदल केले होते. २११ दिवस ते एका वर्षाहून कमी कालावधीत पूर्ण होणाऱ्या मुदत ठेवींवरील व्याजदरांमध्ये एसबीआयने २० बेसिस पॉइंट्सची वाढ करताना, ४.४० टक्क्यांवरून ४.६० टक्के केली आहे. एक वर्षे ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी असलेल्या मुदत ठेवीवर यापूर्वी ५.१० टक्के वार्षिक व्याजदर दिला जात होता, त्या ग्राहकांना आता ५.३० टक्के व्याज मिळेल. दोन ते तीन वर्षांत पूर्ण होणाऱ्या मुदत ठेवीवरील व्याजदर आता ५.३५ टक्के असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com