Calcium Deficiency : कॅल्शियमची कमतरता जाणवतेय? 'या' डेअरी प्रॉडक्टचे करा सेवन

Calcium Deficiency Causes : शरीरामधील कॅल्शियमच्या कमिमुळे आपली हाडे कमजोर पडू लागतात.
Calcium Deficiency
Calcium DeficiencySaam Tv

Deficiency Of Calcium : शरीरामधील कॅल्शियमच्या कमिमुळे आपली हाडे कमजोर पडू लागतात. ही समस्या वाढत्या वयातील व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. डेअरी मधील प्रोडक्टला कॅल्शियमसाठीचा एक चांगला सोर्स मानला जातो. परंतु अनेक व्यक्तींना डेअरी प्रोडक्ट पसंत नसतात. त्यांना त्या प्रॉडक्ट्मुळे एलर्जी होते.

आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये डेअरी प्रोडक्ट्सच्या तुलनेमध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असते. चला तर मग जाणून घेऊया. कॅल्शियम आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचे मानले जाते.

कॅल्शियम फक्त आपल्या हाडांना मजबूत करण्याचे काम नाही करत याशिवाय दातांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. यासोबतच कॅल्शियम हार्ट रिदम आणि मसल्सच्या संकूचनाला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत करते.

Calcium Deficiency
Calcium Deficiency : शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करायची आहे ? तर 'या' 4 पदार्थांचे सेवन करा

शरीरामध्ये कॅल्शियम कमी झाल्यावर हायबोकॅल्शियम नावाच्या आजाराला सामोरे जावे लागू शकते. कन्फ्युजन, मासपेशिंमध्ये एंठन, हात पाय आणि चेहरा सुंदर होऊन जाणे, हाड कमजोर होणे अशा प्रकारची लक्षणे या आजारामध्ये आढळून येतात.

डेअरी प्रोडक्ट्स जसे दूध, पनीर, दही यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. याशिवाय अंडी, मटन, चिकन आणि मास्यांचे सेवन केल्याने शरीरामधील कॅल्शियमची कमतरता पूर्ण होऊन जाते. परंतु अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांना डेअरी प्रॉडक्ट्सने एलर्जी होते. असे अनेक व्यक्ती आहेत ज्यांना नॉनव्हेजचे सेवन करायला आवडत नाही.

अशातच असा प्रश्न निर्माण होतो की हे व्यक्ती त्यांच्या शरीरामधील कॅल्शियमच्या कमिला कशा पद्धतीने पूर्ण करतील. शरीरामधील कॅल्शियमची कमी पूर्ण करण्यासाठी तुम्ही डेअरी प्रोडक्ट किंवा नॉनव्हेज शिवाय अनेक गोष्टींची मदत घेऊ शकता.

सोया मिल्क -

या गोष्टीमध्ये कोणतीही शंका नाही की डेअरी प्रॉडक्ट्सला कॅल्शियमचा चांगला सोर्स मानला जातो. ज्या लोकांना दूध आणि डेअरी प्रॉडक्ट्सपासून एलर्जी असते त्या व्यक्तींनी सोया किंवा बदामच्या दुधाचे सेवन दिले पाहिजे. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम उपलब्ध असते.

हिरव्या पालेभाज्या -पालक, ब्रोकोली, मेथी यांसारख्या पानाच्या हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम उपलब्ध सते. या सगळ्या भाज्या कॅल्शियमला चांगल्या प्रकारे अवशोषित करण्यास मदत करतात.

बरोबर तुमच्या हाडांच्या आणि दातांच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देतात. हिरव्या पानदार भाज्यांमध्ये विटामिन ए, विटामिन के, विटामिन ई, विटामिन सी, बीटा केरोटीन, फोलेट, विटामिन बी1, बी2, बी3, बी5, आणि बी6 सुद्धा असते. त्याचबरोबर हिरव्या पानांच्या भाज्या तुमच्या ओव्हरऑल हेल्थसाठी अत्यंत फायदेशीर असतात.

Calcium Deficiency
calcium deficiency: शरीरातील कॅल्शियमची कमतरता, लक्षणे आणि उपाय

बीन्स आणि डाळ -

तुम्ही डेरी प्रॉडक्ट्स आणि नॉनव्हेज शिवाय कॅल्शियमचा चांगला सोर्स शोधत असाल तर तुमच्यासाठी बियाणे आणि डाळ अतिशय चांगला ऑप्शन आहेत. बियाणांमध्ये आणि डाळिंमध्ये कॅल्शियम सोबत प्रोटीन आणि फायबर उच्च प्रमाणात असते. जे आपल्या डायजेशनसाठी अतिशय फायदेशीर असते. सोबतच आपल्या एनर्जी लेवलला पोस्ट करते.

टोफू -

टोफूमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. 100 ग्रॅम टोफुमध्ये 176 मिलीग्राम कॅल्शियम उपलब्ध असते. टोफूला सोयाबीन पासून बनवले जाते या कारणामुळे याला विगन व्यक्ती खाऊ शकतात. कॅल्शियम शिवाय यामध्ये फायबर, विटामिन्स आणि मिनरल्स त्याचबरोबर प्रोटीन सुद्धा प्रमाणात असते.

नट्स -

नट्सला आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. बादाम आणि ब्राझील नट्समध्ये कॅल्शियमची मात्रा भरपूर प्रमाणात असते. याशिवाय यामध्ये फायबर, हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन उपलब्ध असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com