

Famous Street Food : मुंबईत असे अनेक ठिकाण आहेत. जिथे काही प्रसिध्द पदार्थांची चव आपल्याला चाखायला मिळते. वडा पाव, मिसळ पाव, रगडा पॅटीस, बटाटा वडा असे स्ट्रीट फूड महाराष्ट्रात कुठेही चांगले मिळू शकत नाही.
नवी मुंबई खाद्यपदार्थांच्या बाबतीतही खूप लोकप्रिय आहे आणि इथला मिसळ पाव सर्वोत्तम असल्याचे म्हटले जाते.
सोशल मिडियाच्या काही सर्वेक्षणानुसार असे समजले आहे की, नवी मुंबईत अशी ३ ठिकाणे आहेत जिथे मिसळ पावची चव अजिबात चुकवता येणार नाही. ही कोणती ठिकाणे आहेत. ते जाणून घ्या
यासोबतच तुम्ही कधी नवी मुंबईला (Navi-Mumbai) गेलात तर मिसळ पाव खाण्यासाठी ही ठिकाणे पाहण्यास विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया नवी मुंबईतील त्या खास ठिकाणांबद्दल.
मामलेदार मिसळ
तुम्ही वाशी परिसरात कुठेतरी असाल तर तुम्ही मामलेदार मिसळ चाखायलाच हवी. याशिवाय त्यांच्या महाराष्ट्रात इतरही शाखा आहेत आणि संपूर्ण परिसरातील तरुणांईमध्ये या जागेला विशेष पसंत दिली गेली आहे. मसालेदार मिसळ सोबत कुरकुरीत फरसाणही त्याची चव वाढवते. यासोबतच हे वडापावसाठीही प्रसिद्ध आहे, त्यामुळे तुम्ही येथे जाऊन दोन्ही गोष्टींचा आनंद घेऊ शकता.
किंमत- रु. ६० पासून सुरू
वेळ- सकाळी ९ ते रात्री ९
श्री समर्थ मिसळ
खारघरमधील गुरुद्वारा रोडजवळचा हा छोटासा कॅफे खूप लोकप्रिय आहे. सकाळी नाश्त्यासाठी ऑफिस (Office) आणि कॉलेजला जाणाऱ्यांची येथे मोठी गर्दी असते. त्यांची मिसळ आणि वडापाव खूप चवदार असल्याचे लोक सांगतात. तसेच बटाटा भजीलाही चांगली मागणी आहे.
मिसळ बनवण्यासाठी श्री समर्थ हे काही सिक्रेट मसाले घालतात, त्यामुळे ती इतर ठिकाणांपेक्षा वेगळी आणि स्वादिष्ट बनते. २००९ साली जेव्हा हा स्टॉल सुरू झाला तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी आपला दर्जा कायम ठेवल्याचे लोक सांगतात. जर तुम्ही त्या दिशेने गेलात तर त्यांच्या स्टॉलला भेट द्यायला विसरू नका.
किंमत- रु.४५ पासून सुरू
वेळ- सकाळी ९ ते रात्री ८
मौली मिसळ - नाद नाशिकचा
नवी मुंबईतील ऐरोली येथे असलेला हा स्टॉल आपल्या मिसळच्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्यांच्याकडे मिसळचे दोन प्रकार देखील आहेत - एक मध्यम मसालेदार आणि एक मसालेदार मिसळ, ज्यामध्ये त्यांचा मसाला आणि गरम मसाला चवदार असतो.
तुम्ही इथे मिसळ पाव थाळी देखील घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला मिसळ पाव सोबत पापड, गुलाब जामुन आणि कोकम सरबत मिळते. या परिसरात हा पदार्थात खूप आवडतो. तुम्ही इथे जात असाल तर मिसळ पाव सोबत त्यांच्या प्रसिद्ध सोलकढीचा आस्वादही घेऊ शकता.
किंमत- रु.६० पासून सुरू
वेळ - सकाळी ९ ते दुपारी ४
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.