Janmashtami Special Recipe 2022 : जन्माष्टमी निमित्त पूजेत ठेवा हा प्रसाद, जाणून घ्या त्याची रेसिपी

जन्माष्टमीला श्री कृष्णाचा प्रसाद बनवत असाल तर यावेळी या रेसिपी ट्राय करुन पहा.
Janmashtami Special Recipe 2022
Janmashtami Special Recipe 2022Saam Tv

Janmashtami Special Recipe 2022 : १९ ऑगस्टला जन्माष्टमीचा सण साजरा केला जाईल. अशा वेळी श्रीकृष्ण जन्मानिमित्त जगभर उत्सव होईल आणि लोक उपवास (Fast) ठेवतील.

या दिवशी विविध पदार्थ तयार केले जातात. मिठाई आणि प्रसाद देवाला अर्पण केला जातो. अशा परिस्थितीत आपण कोणत्या पदार्थांची मिठाई बनवायची यामध्ये अडकले असू तर जाणून घ्या.

श्री कृष्णाला लोणी आणि साखरेची मिठाई आवडते. आपण त्याचा प्रसाद बनवून नैवेद्य ठेवा. ती बनवायची कशी हे जाणून घेऊया.

मक्खन मिश्री रेसिपी

जन्माष्टमीचा सण लोण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. भगवान श्रीकृष्णाला लोणी खूप प्रिय होते आणि म्हणूनच त्यांना प्रेमाने माखन चोर म्हणतात. त्यात साखर मिसळून परमेश्वराला प्रसाद दिला जातो. आपण घरीही बनवू शकता, चला जाणून घेऊया त्याची रेसिपी.

Sweet curd
Sweet curdCanva

साहित्य-

तूप - १/२ कप

बर्फाचे तुकडे - ४ ते ५

खडीसाखर- ३ चमचे

लोणी

कृती-

१. लोणी मिश्री बनवण्यासाठी आपण पांढरे आणि ताजे ताक देखील घेऊ शकता. पण लोणी नसेल तर तुपात बर्फ घालून चांगले फेटावे.

२. तूप घालताना, लोणी वेगळे होताना दिसेल. त्यातून बर्फ काढा आणि तयार मिश्रणामध्ये खडीसाखर घाला आणि चांगले मिसळा.

३. तयार होईल मक्खन मिश्री रेसिपी. सर्व्ह करुन आपण नैवेद्य ठेवू शकतो.

धणे पंजिरी रेसिपी -

पंजिरी हा श्रीकृष्णाला अर्पण केला जाणारा दुसरा भोग आहे. पंजिरी बनवायला खूप सोपी आहे पण यावेळी जन्माष्टमीच्या मुहूर्तावर धण्याची पंजिरी करून प्रसादाला थोडा ट्विस्ट देता येईल. त्यात भरपूर ड्रायफ्रुट्स आणि तूप मिसळून ते बनवले जाते. चला जाणून घेऊया त्याची रेसिपी.

 Dhaniya Panjiri Recipe
Dhaniya Panjiri RecipeCanva

साहित्य-

धणे पूड - १ कप

साखरेचा (Sugar) पाक - १/२ कप

बारीक चिरलेले बदाम - १/२ कप

बारीक चिरलेले काजू - १/२ कप

मनुका - १ चमचा

किसलेले खोबरे - १/२ कप

तूप- २ चमचे

मखाणे - १/२ कप

वेलची पावडर - १/२ चमचा

कृती-

१. कढईत १ चमचा तूप गरम करून त्यात काजू आणि बदाम घालून हलके तळून घ्या. नंतर एका भांड्यात काढून बाजूला ठेवा.

२. आता त्याच कढईत मखाणे टाका आणि तेही तळून घ्या आणि नंतर बाहेर काढून बाजूला ठेवा.

३. त्याच कढईत उरलेले तूप गरम करून त्यात धणेपूड टाकून १० मिनिटे मंद आचेवर तळून घ्या. लक्षात ठेवा की धणे पूड चांगली भाजली पाहिजे नाहीतर त्याची चव कडू लागेल. धणे पावडरमधून सुगंध येऊ लागला की गॅस बंद करा.

४. आता मखणे, भाजलेले बदाम-काजू, बेदाणे, वेलची पावडर आणि साखर पावडर घालून मिक्स करा. पुन्हा मंद आचेवर ठेवा आणि २ मिनिटांनी गॅस बंद करून थंड करा.

५. पंजिरी प्रसादही तयार आहे, तो नैवेद्य म्हणून ठेवू शकतात किंवा प्रसादातही वाटू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com