फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर अनेक सोशल मीडिया ॲप्सनी लोकांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आणि लोकांना नेहमी एकमेकांशी कनेक्ट होण्याचा पर्याय दिला, परंतु आता सोशल मीडियावरील वापरकर्ते गोपनीयतेबद्दल अधिक जागरूक झाले आहेत. त्यातील एक साईट म्हणजे फेसबूक. आज फेसबूक २० वर्षाचे झाले आहे. यामुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे.(Latest News)
या २० वर्षांमध्ये फेसबुकने सोशल मीडियाची व्याख्या खूप बदलून टाकली आहे. काही वेळा फेसबूकचे कौतुक केले गेले आहे आणि तर काही वेळा फेसबुकसह इतर सोशल मीडिया ॲप्सवर अनेक गंभीर आरोप झाले आहेत. याचदरम्यान यावर्षी भारत, अमेरिका, पाकिस्तान आणि रशियासह जगातील ८ देशांमध्ये राष्ट्रपती किंवा पंतप्रधानपदाच्या निवडणुका होणार आहेत.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या निवडणुकीच्या वर्षात जगभरातील राजकीय पक्षांनी सोशल मीडियावर आपला प्रचार सुरू केलाय. पक्षांकडून होणाऱ्या आक्रमक प्रचारात नेते एकमेकांवर गंभीर आरोप करतात. तर कधी आक्षेपार्ह विधानं करत असतात. त्याचा फटका सोशल मीडियाला सहन करावा लागतो. अमेरिकन वृत्तपत्र द इकॉनॉमिस्टच्या अहवालानुसार २०२० च्या तुलनेत २०२४ मध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक वापरकर्त्यांनी सोशल मीडियाचा वापर केला. मात्र या काळात युजर्सनी केलेल्या पोस्टमध्ये घट झालीय.
सोशल मीडिया अल्गोरिदम आता AI द्वारे ठरवले जात आहेत. तुम्ही जे पाहत आहात ते AI तुम्हाला दाखवत आहे. यासाठी तुमचा मोबाईल, लॅपटॉप, सर्च हिस्ट्री वापरली जात आहे. आता सोशल मीडियावरील वापरकर्तेही त्यांच्या गोपनीयतेबाबत जागरूक झाले आहेत. अशा परिस्थितीत युजर्सनी पोस्ट करणेही कमी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.