Heart Attack in Women : महिलांना हार्ट अटॅक येण्याआधी जाणवतात 'ही' लक्षणे; विपरीत घडण्याआधीच सावध व्हा!

Signs of Heart Attack in Women : काही महिला मुलांसाठी किंवा घरातील विविध वस्तू खरेदी करायच्या म्हणून स्वत:च्या आरोग्याकडे निट लक्ष देत नाहीत.
Signs of Heart Attack in Women
Heart Attack in Women Saam TV
Published On

सध्या कामाच्या धावपळीत प्रत्येक व्यक्तीला आपल्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देता येत नाही. कामाचा ताण वाढल्याने व्यक्तीच्या डोक्यावरील ताण सुद्धा वाढतो. त्यात महिला कायम आपल्या मनातील गोष्टी मोकळेपणाने व्यक्त करत नाहीत. सर्व गोष्टी मनात साठवून ठेवतात. घरातील काम आणि ऑफिसमधील प्रेशर दोन्हीमध्ये महिलांचा मानसिक ताण वाढतो. त्यांना स्वत:च्या आरोग्याकडे फार लक्ष देता येत नाही. त्यामुळे त्यांना हृदयविकाराच्या गंभीर समस्या उद्भवतात.

Signs of Heart Attack in Women
Monsoon Health Care : आला पावसाळा, आरोग्य सांभाळा! मान्सून एन्जॉय करताना, 'अशी' घ्या आरोग्याची काळजी

महिलांमध्ये जाणवतात हृदयविकाराची लक्षणे

काही महिला मुलांसाठी किंवा घरातील विविध वस्तू खरेदी करायच्या म्हणून स्वत:च्या आरोग्याकडे निट लक्ष देत नाहीत. त्या सतत कामात व्यस्त राहतात. अशात त्यांना जाणवणारे छोटे मेठे आजार अंगावरच काढतात. त्यामुळे महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याआधी कोणती लक्षणे जाणवतात याची माहिती जाणून घेणार आहोत.

छातीत दुखणे

छातीत सतत दुखणे हे हार्ट अटॅकचे महत्वाचे लक्षण आहे. काही महिलांना सतत छातीत जखडते, काहीतरी टोचत आहे, दबाव वाढत आहे असं वाटत राहतं. असा त्रास तुम्हाला सतत जाणवत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. काही दिवसांनी तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

अंगदुखी

काही महिलांना खांदे, पाठ, मान आणि पोट दुखते. सतत शरीरातील असे अवयव दुखत असतील तर हे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. काही महिलांना या समस्या वेगवेगळ्या गोष्टींचे टेंशन असल्याने सुद्धा होतात. तुम्हालाही या समस्या असतील तर आजच त्यावर उपाय करा.

सतत घाम येणे

काही महिलांना सतत घाम येतो. काही कारण नसताना सुद्धा बऱ्याच वेळा घाम येतो. शक्यतो आपण धावतो, मेहनतीचे काम करतो तेव्हाच आपल्याला घाम येतो. मात्र काही महिलांना जेवताना फॅन सुरू असेल तेव्हा सुद्धा घाम येतो. सतत घाम येणे ही समस्या आपल्या हृदयाशी संबंधित आहे.

श्वास अडकणे

काही महिलांना रडताना किंवा मेहनतीचे काम केल्यावर तसेच मोठी भयंकर गोष्ट पाहिल्यावर घाबरतात. अशा स्थितीत त्यांना श्वास घेण्यात अडचणी येतात. श्वासाची ही अडचण जास्त वाढल्यास भविष्यात अशा महिलांना हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता असते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Signs of Heart Attack in Women
Chhattisgarh Health Center: धक्कादायक! आरोग्य केंद्रावर वीज संकट; मोबाईल टॉर्चच्या उजेडातच रुग्णांवर उपचार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com