Chaines Bhel Recipe: घरच्या घरी ट्राय करा चटपटीत चायनीज भेल, रेसिपी पाहा

How To Make Chinese Bhel at Home Know in Marathi: जर तुम्हालाही काही चटपटीत खायचे असेल तर चायनीज भेलची रेसिपी ट्राय करु शकता.
Homemade Chinese Bhel
Homemade Chinese BhelSaam Tv
Published On

Chinese Bhel Recipe in Marathi:

संध्याकाळी आपल्यापैकी अनेकांना भूक लागते. चहासोबत स्नॅक्स खायला सगळ्यांना आवडते. यावेळी काहीतरी चटपटीत चाट सुद्धा आवडीने खाल्ला जातो. जर तुम्हालाही काही चटपटीत खायचे असेल तर चायनीज भेलची रेसिपी ट्राय करु शकता.

भेळ हे एक चटपटीत स्नॅक्स रेसिपी आहे. संध्याकाळच्या वेळी भूक लागली तर आपण चाट प्रकारातील भेळ, शेवपुरी, पॅटीस यांसारखे पदार्थ आवडीने खातो. भेळ ही बनवायला अगदी सोपी आहे. क्रंची, चटपटीत चायनीज भेळ बनवायला अगदी सोपी आहे. हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण सहज खातात रेसिपी (Recipes) कशी बनवायची जाणून घेऊया

Homemade Chinese Bhel
Solkadhi Recipe: कोकणी स्टाइलने बनवा थंडगार सोलकढी, परफेक्ट रेसिपी पाहा

1. साहित्य

  • हक्का नूडल्स - १ पॅकेट

  • कापलेले गाजर - २ मोठे चमचे

  • बारीक चिरलेली कोबी - २ चमचे

  • बारीक चिरलेली सिमला मिरची - २ चमचे

  • स्ट्रिप्समध्ये चिरलेला कांदा (onion) - २ चमचे

  • शेझवान सॉस - १ चमचा

  • लाल मिरची - १ चमचा

  • ग्रीन चिली सॉस - १ चमचा

  • व्हिनेगर - १ चमचा

  • साखर (Sugar) - १/२ चमचा

  • चवीनुसार मीठ

Homemade Chinese Bhel
Sabudana Papad Recipe: उन्हाळ्यात बनवा साबुदाणा पापड, कुरकुरीत आणि टेस्टी बनतील; पाहा रेसिपी

2. कृती

  • चायनीज भेळ बनवण्यासाठी सर्वात आधी कढईत नूडल्स उकळवा. पाणी काढून टाका आणि थंड पाण्याने (Water) धुवा.

  • आता कढईत तेल गरम करा आणि त्यात उकडलेले नूडल्स घाला. यानंतर पॅनमध्ये सर्व भाज्या, सॉस, मीठ आणि साखर एकत्र करा.

  • नंतर यात नूडल्स घालून चांगले मिक्स करा. वरुन कोथिंबीर घालून सर्व्ह करा. चटपटीत चायनीज भेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com