
आजकाल तरुणांमध्ये इअरफोन्सचा वापर वाढत चालला आहे. सकाळच्या प्रवासापासून ते ऑनलाइन क्लासेस, कॉल्स घेणे किंवा दिवसभर गाणी ऐकणे यासाठी इअरफोन्स दैनंदिन जीवनाचा एक भाग झाले आहेत. मात्र, त्यांचा अतिवापर, विशेषतः जास्त आवाजात, केवळ ऐकण्याची क्षमताच नव्हे तर एकूण आरोग्यावरही वाईट परिणाम करू शकते. पुढे आपण इअरफोनचा वापर केल्याने कोणते नुकसान होते आणि काय उपाय करायला हवे याबद्दल जाणून घेणार आहेत.
इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑटोरहिनोलॅरिन्गोलॉजी अँड हेड अँड नेक सर्जरीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, १८ ते २६ वयोगटातील अनेक विद्यार्थ्यांना इअरफोनच्या दीर्घकाळ वापरामुळे कानदुखी, खाज, कानात मेण साचणे, ऐकण्यात बदल आणि टिनिटससारख्या समस्या जाणवल्या. विशेष म्हणजे, वायर्ड इअरफोन वापरणाऱ्यांमध्ये या समस्या अधिक प्रमाणात आढळल्या आहेत . यामागील मुख्य कारण म्हणजे स्वच्छतेची कमतरता.
बऱ्याचदा हे इअरफोन मित्रांसोबत शेअर केले जातात किंवा योग्यरीत्या स्वच्छ केले जात नाहीत. वायर्ड इअरफोन्स बॅगमध्ये सैल पडतात, ज्यामुळे त्यांच्यावर घाण, घाम आणि लिंट जमा होते, आणि हे थेट कानाच्या नलिकेत जाऊन संसर्गाचा धोका वाढवते.
शारीरिक त्रासांबरोबरच, सतत इअरफोन वापरण्यामुळे डोकेदुखी, रक्तदाबात बदल, मानसिक थकवा, एकाग्रता कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे आणि झोपेची गुणवत्ता घटणे अशा समस्या देखील उद्भवू शकतात.
तज्ज्ञांचे मत आहे की इअरफोनचा वापर पूर्णपणे थांबवण्याची गरज नाही, परंतु काही सवयी बदलणे आवश्यक आहे. ब्लूटूथ इअरफोन्स वापरणे, सिलिकॉन इअर टिप्सचा वापर आणि नियमित स्वच्छता राखणे यामुळे धोका कमी करता येतो. तसेच, आवाजाचा स्तर कमी ठेवणे आणि सततच्या वापराऐवजी मध्यम वापराची सवय लावणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.