HIV Symptoms: 'सतत ताप, वजन कमी होणे...'; पुरुषांमध्ये एड्सची सुरुवातीची 7 भयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो धोका

AIDS Warning Signs Male: पुरुषांमध्ये एचआयव्हीची सुरुवातीची लक्षणे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ताप, थकवा, वजन कमी होणे आणि वारंवार संसर्ग ही गंभीर चिन्हे असून वेळेत चाचणी केल्यास धोका टाळता येतो.
AIDS Warning Signs Male
HIV SymptomsGoogle
Published On

काही आजारांची लक्षणं ओळखणं खूप कठीण असतं. काही सामान्य वाटणाऱ्या समस्या घातक रोगाच्या असू शकतात. याचा आपण विचारही करत नाही. जसं की, जर काही खाल्ल्यावर छातीत हलक्या वेदना होत असतील तर आपण गॅसची समस्या समजून दुर्लक्षित करतो. पण ही हे हार्ट अटॅकचे लक्षण सुद्धा असू शकतं. अशीच एक गंभीर समस्या किंवा आजार म्हणजे पुरुषांना होणारा HIV किंवा एड्स आहे.

एचआयव्ही (HIV) हा एक गंभीर विषाणू असतो. यामध्ये Acquired Immunodeficiency Syndrome ही जीवघेणी अवस्था निर्माण होते. यात ३ टप्पे म्हणजे, Acute HIV, Chronic HIV, आणि AIDS असतात. पुरुषांमध्ये एचआयव्हीची लागण झाल्यानंतर जवळपास 2 ते 4 आठवड्यांत काही लक्षणं दिसायला सुरुवात होते. ही लक्षणं वेळेत ओळखणं खूप महत्वाचं आहे. पुढील माहितीत आपण पुरुषांमध्ये आढळणारी एड्सची सुरुवातीची लक्षणे कोणती? याबद्दल महत्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत.

AIDS Warning Signs Male
High Blood Pressure: रोजच्या या ४ चुकांमुळे वाढतो BP; वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी सांगितली महत्वाची माहिती

पुरुषांमध्ये एड्सची सुरुवातीची लक्षणे

१. सतत येणारा ताप

अचानक ताप येतो आणि अनेक दिवस जात नाही अशी लक्षणे तुम्हाला दिसू शकतात. यामध्ये कोणतंही स्पष्ट कारण नसतानाही ताप अंगात राहतो.

२. घसा दुखणे आणि खवखवणे

तापासोबत घशात पाणी गिळताना सुद्धा दुखणं ही सुद्धा गंभीर लक्षणे असू शकतात.

३. सतत थकवा जाणवणे

शरीरात कमजोरी आणि ऊर्जा कमी वाटणं. तसेच विश्रांती घेतल्यानंतर सुद्धा थकवा न जाणवणं हे सुद्धा लक्षण असू शकतं.

४. वजन झपाट्याने कमी होणे

कोणताही प्रयत्न न करता वजन कमी होणं, हे मोठं लक्षण आहे. याकडे पुरुषांनी अजिबात दुर्लक्ष करु नका. शरीरातले मसल मास कमी होणं ही साधी समस्या नसते.

५. तोंडात पांढरी पुटे (Oral Thrush)

तुम्हाला एचआयव्हीमध्ये जीभेवर पांढरी परत दिसते. कॅन्डिडायसिस (फंगल इन्फेक्शन) होण्याची शक्यता असते.

६. वारंवार संसर्ग होणे

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे तुम्हाला या स्थितीत अनेक आजार होऊ शकतात. कॅन्सर, फंगल इन्फेक्शन यांसारखे आजारही यामध्ये होऊ शकतात. तसेच इन्फेक्शनमुळे लघवी करताना वेदना होऊ शकतात. बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. सतत चक्कर येऊ शकते. त्यामुळे एचआयव्हीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी होते. म्हणूनच सामान्य आजारही गंभीर रूप धारण करू शकतात.

टीप: वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका. वेळेत HIV चाचणी करून डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य उपचार घेतल्यास आजार नियंत्रित ठेवणे शक्य आहे. साम टिव्ही याच्याशी सहमत नाही.

AIDS Warning Signs Male
Gold Rate: सोनं झालं स्वस्त, तब्बल १२ हजारांनी भाव कोसळला; चांदीही ३५ हजारांनी घसरली, महिनाभरात नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com