
उद्या म्हणजेच २ ऑक्टोबर २०२५ रोजी दसरा सण साजरा होणार आहे. दसरा या सणाला विजयादशमी म्हणून देखील ओळखले जाते. या दिवशी रावण दहन केले जाते हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. दसऱ्याच्या दिवशी शारदीय नवरात्रीत पेरलेल्या जवाचा वापर करून घरांमध्ये विशेष पूजा केली जाते. याच दसऱ्याच्या विधी आणि शुभ मुहूर्ताबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.
२ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. दसरा पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 2: 09ते 2:56 पर्यंत असेल. या व्यतिरिक्त, दुपारी 1:21 ते 3:44 पर्यंतचा वेळ देखील शुभ मानला जातो. नवरात्रीत पहिल्या दिवशी घटस्थापनेबरोबर कलश स्थापना करताना जव पेरले जाते. जे नवीन सुरूवात, समृद्धी आणि देवतेच्या कृपेचे प्रतीक मानले जाते.
नवरात्रीत उगवलेल्या जवचा उपयोग दसऱ्याच्या पूजेत केला जातो, कारण जव हे वाढ, समृद्धी आणि सुदैवाचे प्रतीक मानले जाते. घटस्थापनेच्या दिवशी मातीमध्ये जव पेरले जाते आणि नवरात्रीच्या नऊ दिवसात त्याची वाढ होते, जे आगामी वर्षाच्या प्रगतीचे प्रतीक मानले जाते. हे जव दसऱ्याला देवीला अर्पण केले जाते आणि ते खाणे हे मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक उर्जा वाढवणारे मानले जाते
दसऱ्याच्या दिवशी, घरामध्ये नवरात्रीत पेरलेल्या जवाचा वापर विधीसाठी केला जातो. नऊ शेणाचे गोळे किंवा काठ्या बनवल्या जातात त्यावर हिरवे जव ठेवले जाते. त्यानंतर घरातील सर्वजण गोळ्यांजवळ बसतात, देवीची आरती करतात. घरातील पुरूष कानामध्ये दवा ठेवतात यामुळे घरात ज्ञान, शांती आणि आनंद पसरतो अशी मान्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.