Winter Kidney Care: थंडीत कमी पाणी पिताय? किडनी आणि ब्रेन स्ट्रोकचा वाढेल धोका, तज्ज्ञांचा इशारा

Winter Health: थंडीत अनेकजण कमी पाणी पितात, पण ही सवय किडनी आणि मेंदूसाठी धोकादायक ठरू शकते. कमी पाणी प्यायल्याने थकवा, गडद लघवी आणि एकाग्रता कमी होण्याच्या तक्रारी वाढतात.
cold weather hydration
winter water intakegoogle
Published On

हिवाळ्याला सुरुवात झाली की प्रत्येकाच्या घरात गरम पाण्याचे टोप पिण्यासाठी भरून ठेवले जातात. पण या वातावरणात किती प्रमाण पाणी प्यायलं पाहिजे? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. शरीरासाठी पाणी अत्यंत महत्वाचं असलं तरी त्याचे प्रमाण वेळ आपण लक्षात घेतली पाहिजे. पुढे आपण कमी पाणी प्यायल्याने तुमच्या किडनी आणि मेंदूला धोका निर्माण होतो का? या प्रश्नांचे तज्ज्ञांच्या माहितीनुसार उत्तर जाणून घेणार आहोत.

थंडीत लोक पाण्याचे सेवन कमी प्रमाणात करतात. थंड हवेमुळे आणि पाणीही थंड असल्यामुळे अनेक जण दिवसभर खूपच कमी पाणी पितात. मात्र आरोग्य तज्ञांच्या मते ही सवय शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. विशेषत: जे लोक दिवसाला 500 मिलीपेक्षा कमी पाणी पितात, त्यांच्यात मोठ्या समस्या होण्याचा धोका वाढतो. यामध्ये किडनीची कार्यक्षमता कमी होते आणि मेंदूपर्यंत ऑक्सिजन कमी पोहोचतं यांसारख्या गंभीर गोष्टींचा समावेश आहे.

cold weather hydration
Brain Stroke: ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितले प्रभावी उपाय

तज्ञ सांगतात की, शरीरात पुरेसं पाणी नसल्याने किडनीला फिल्टरेशनचे काम करायला जास्त ताण येतो. त्यामुळे लघवी गडद होते आणि शरीरातील पदार्थ योग्य प्रमाणात बाहेर निघत नाहीत. अशी स्थिती जास्तवेळ राहिल्यास किडनीचं नुकसान होऊ शकतं. फक्त किडनीच नाहीतर मेंदूवरही त्याचा परिणाम दिसतो. पाणी कमी प्यायल्याने रक्ताचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. यामुळे सतत थकवा जाणवणे, एकाग्रता कमी होणे, चिडचिड किंवा मूड स्विंग्स यांसारख्या समस्या दिसू शकतात.

हिवाळ्यात कमी पाणी घेतल्यामुळे स्नायूंनाही पुरेशी ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे काम करताना थकवा जाणवणे किंवा मसल्समध्ये वेदना जाणवू शकतात. याशिवाय पचन प्रक्रियेलाही याचा मोठा फटका बसतो. गडद लघवी, तापमान नियंत्रणात अडचण, किडनी फिल्टरेशन रेट कमी होणे यांसारख्या समस्या दीर्घकाळ राहिल्यास पुढे गंभीर आजार उद्भवू शकतात. त्यामुळे थंडीतही दिवसातून पुरेसे पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे.

cold weather hydration
Tuesday Horoscope: ४ राशींच्या व्यक्तींना गुंतवणूक ठरेल लाभदायक, पैशाची तंगी होईल दूर, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com