Tuesday Horoscope: ४ राशींच्या व्यक्तींना गुंतवणूक ठरेल लाभदायक, पैशाची तंगी होईल दूर, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

आजचा दिवस बेरीज वजाबाकीचा म्हणू शकता. म्हणजे काही अधिक उणे असेल.पण एकमेकांच्या समजूतीने पुढे जाल अशी संसारिक आणि व्यवसायामध्ये आपल्या जोडीदाराची साथ मिळणार आहे.

Mesh | saam tv

वृषभ

नोकरी नोकरीमध्ये कष्ट केले असतील तर त्याचे फळ आज तुम्हाला मिळेल. अडचणी आल्या तरी त्या बाजूला सारून आपला तुम्ही आज पार पाडाल. शत्रूंचा पाडाव करून आपला मार्ग सुकर कराल .

वृषभ राशी | SAAM TV

मिथुन

शेअर्ससाठी, लॉटरी साठी आजचा दिवस चांगला आहे. धनाची निगडित गुंतवणूक करण्यासाठी सुदिन आहे असेच म्हणू शकता. विष्णू उपासना फलदायी ठरणार आहे. प्रेमात यश मिळेल.

Mithun | saam tv

कर्क

शेतीवाडीच्या कामांमध्ये व्यवहार सकारात्मक होतील. वाहन घर खरेदीसाठी नवीन पाऊल उचलायला आज हरकत नाही. प्रवासाला दिवस चांगला आहे. व्यवसायामध्ये एक टप्पा पुढे यश आहे.

kark | saam tv

सिंह

मोठ्या महामंडळाच्या सहकार्याने पुढे जाल. जवळचे प्रवास होतील. जे ठरवाल ते करणारच अशी काहीशी जिद्द घेऊन दिवसाची परिणीती होईल.

सिंह राशी | Saam Tv

कन्या

वडिलोपार्जित इस्टेटिसंबंधी महत्त्वाचे निर्णय होतील. पत्रव्यवहार, कागदपत्रे यांच्याशी निगडित सर्व कामे आज जपून करणे गरजेचे आहे. पुढे फसवणूक होणार नाही ना याची काळजी घ्यावी.

Kanya Rashi | Saam TV

तुळ

मनोवांछित इच्छा पूर्ण होण्याचा दिवस आहे. म्हणूनच चांगले इच्छा मनी धरा त्या नक्की पूर्ण होतील. नव्याने नवे संकल्प घेऊन आजचा दिवस आलेला आहे.

तुळ | saam tv

वृश्चिक

कटकटी अडचणी वाढतील असा काहीसा दिवस वाटतो आहे. आपले महत्त्वाचे ऐवज आणि जिन्नस सांभाळा. मनोव्यथा जवळच्या व्यक्तीलाच सांगा.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात सुख वाटेल. जवळच्या स्नेही आणि परिचिता जवळ स्नेहभोजनाचे योग येणार आहेत. जुन्या केलेल्या गोष्टीतून लाभ मिळतील.

Dhanu Rashi | Yandex

मकर

सामाजिक क्षेत्रामध्ये वेगळी घोडदौड होईल. कामाच्या ठिकाणी आपण काम केले त्याला योग्य प्रशस्तीपत्र मिळेल. ठरवून केलेल्या गोष्टीत बिनचूक कामे होण्याचा आजचा दिवस आहे.

मकर | Saam Tv

कुंभ

शंकराची उपासना आज फलदायी ठरेल तीर्थक्षेत्रि भेटी होतील. प्रेमामध्ये यश मिळेल. नातवंड सौख्याला दिवस चांगला आहे.

कुंभ | Saam Tv

मीन

अनावश्यक पैशाचा आज लोभ टाळणे गरजेचे आहे. एकट्याने काम करून, यश मिळवून कष्टाचा पैसा आज फलदायी ठरेल. इतरांचे उपकार घेऊन कोणतीही गोष्ट करू नका.

Meen | Saam Tv

NEXT: Soft Chapati Tips: थंडीत चपात्या मऊ राहत नाहीत? वातड होतात? वापरा ‘ही’ १ ट्रिक, सॉफ्ट अन् टम्म फुगतील चपात्या

soft roti tricks
येथे क्लिक करा