Amla Juice Benefits : आवळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर समजला जातो.आवळ्याचा रसात व्हिटॅमिन सी, कॅल्शियम,आयरन ,अँटीऑक्साइड भरपूर असते. त्यामुळे आवळयाला औषधाचा दर्जा देण्यात आलेला आहे.
आवळ्याचा रस आपण घरच्या घरी बनवून सुद्धा घेऊ शकतो. आवळा पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे अशावेळी रिकाम्या पोटी आवळ्याच्या रसाचे सेवन केले तर तुम्हाला त्याचे अनेक फायदे होतील.चला तर मग जाणून घेऊया रिकाम्या पोटी आवळ्याचे रस घेण्याचे काय फायदे होतात.
1. साखर ते युरिक ऍसिडसाठी फायदेशीर
आवळ्याचा रस नियमितपणे रिकामी पोटी घेत असल्याने तुमचे शरीर डिटॉक्स करते. आवळा मध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण असते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहण्यास मदत होते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण व यूरिक ऍसिड कमी होते. रक्तामध्ये गोठलेली चरबी कमी करण्यासाठी आवळा फायदेशीर आहे यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात सेवन केले पाहिजे.
2. त्वचेवरील (Skin) डाग कमी करण्यासाठी फायदेशीर
आवळ्यामुळे त्वचाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.तुम्ही दररोज रिकाम्या पोटी आवळ्याचा रस पिऊ शकता किंवा चेहऱ्यावर तो रस लावू शकता त्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात.
3. केसांना काळे करते
आवळा केसांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे केसांना मजबूत करण्यासाठी आवळ्याचा वापर करतात तसेच जर तुम्हाला पांढरे केस काळे करायचे असेल तर तुम्ही आवळ्याचा वापर करू शकता त्यासाठी तुमच्या केसांना आवळ्याचा रस लावा आणि एक ते दोन तास राहू द्या त्यानंतर साध्या पाण्याने धुवा असे केल्याने तुमचे केस काही दिवसात मजबूत आणि काळभोर होतील.
4. दृष्टी (Eye) सुधारण्यासाठी
तुमच्या डोळ्यात जर जळजळ असेल,खाज येत असेल,पाणी येणे इत्यादी समस्या दूर करण्यासाठी तुम्ही आवळ्याचा वापर करू शकता तसेच रोज रिकाम्या पोटी आवळ्याचा रस पिल्याने या समस्या दूर होतील आणि तुमच्या दृष्टीत सुधारणा होईल.
5. या आजारांसाठी (Disease) आवळ्याचा रस फायदेशीर आहे.
खोकला ,ताप ,जुलाब, अपचन ,मोतीबिंदू ,नाकातून रक्त येणे ,कावीळ कुष्ठरोग, बद्धकोष्ठता इत्यादी आजारापासून बचाव करण्यासाठी तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस घेणे खूप फायदेशीर आहे.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.