Carrot Juice Benefits : हिवाळ्यात प्या गाजराचा ज्यूस, अनेक समस्यांवर फायदेशीर !

हिवाळ्यात अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळे मिळतात.
Carrot Juice Benefits
Carrot Juice Benefits Saam Tv

Carrot Juice Benefits : हिवाळ्यात अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळे मिळतात. खाण्यापिण्याचे शौकीन असलेले लोक या ऋतूची आतुरतेने वाट पाहत असतात. या हंगामात रंगीबेरंगी गाजरही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.

लोक त्याचा अन्नामध्ये अनेक प्रकारे समावेश करतात. काहींना गाजराची कोशिंबीर, भाजी किंवा लोणचे खायला आवडते तर काहींना गाजराची हलवा खूप आवडते.

हिवाळ्यात निरोगी (Healthy) राहण्यासाठी तुम्ही गाजराचा रस देखील पिऊ शकता. यामध्ये पोषक तत्वे भरपूर प्रमाणात आढळतात, ज्यामुळे अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. चला जाणून घेऊया, गाजराचा रस पिण्याचे कोणते फायदे आहेत.(Health)

Carrot Juice Benefits
Carrot: गाजराची फॅक्टरी असलेले गाव..संक्रांतीच्या तोंडावर भाव वधारले

वजन कमी करण्यात मदत -

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर गाजराच्या रसाचा आहारात नक्की समावेश करा. यामध्ये भरपूर फायबर असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. गाजराचा रस प्यायल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते, ज्यामुळे तुम्ही जास्त खाणे टाळू शकता.

दृष्टीसाठी -

शरीरात व्हिटॅमिन-एच्या कमतरतेमुळे डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. हे जीवनसत्व गाजरात पुरेशा प्रमाणात असते. निरोगी डोळ्यांसाठी तुम्ही गाजराचा रस नियमित सेवन करू शकता.

Carrot Juice Benefits
Benefits Of Potato Juice : बटाट्याचा रस प्यायल्याने होऊ शकते प्रतिकारशक्ती मजबूत, जाणून घ्या त्याचे अनेक फायदे

त्वचेसाठी फायदेशीर -

गाजराचा रस प्यायल्याने आरोग्यासोबतच त्वचाही चमकदार होते. यामध्ये असलेले बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन-सी त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवते.

निरोगी हृदयासाठी -

गाजराच्या रसामध्ये पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म पुरेशा प्रमाणात आढळतात. याच्या नियमित सेवनाने रक्तदाब संतुलित राहतो आणि हृदयाशी संबंधित इतर समस्यांचा धोकाही कमी होतो.

रक्तातील साखर -

ज्यांना ब्लड शुगरची समस्या आहे त्यांनी रोजच्या आहारात गाजराच्या रसाचा समावेश करावा. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी आहे. जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By : Shraddha Thik

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com