Amla Powder Benefits : आवळ्याच्या पावडरचे गुणकारी फायदे जाणून घ्या

छातीत जळजळ आणि अॕसिडीटीचा त्रास अनेकांना होत असतो.
Amla Powder Benefits
Amla Powder Benefits Saam Tv
Published On

Amla Powder Benefits : छातीत जळजळ आणि अॕसिडीटीचा त्रास अनेकांना होत असतो. अॕसिडीटी झाल्यावर लोक गोळ्या खातात. गोळ्या खाल्ल्यानंतर काही वेळ अॕसिडीटीचा त्रास कमी होतो. पण नंतर पुन्हा त्रास जाणवतो. त्यामुळे जर तुम्हाला पित्ताचा त्रास कमी करायचा असेल तर तुम्ही आवळा पावडर घातलेलं पाणी (Water) पिऊ शकता.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर -

आवळ्यामध्ये एथेनॉलिक नावाचे तत्व आढळते. यामध्ये अँटीहायपर लिपिडेममिक (चरबी कमी करणारे) आणि अँटिऑक्सिडंट्स गुण आढळतात. यामुळे आवळ्याच्या पावडरच्या सेवनाने तुमचे वजन वाढत असेल तर ते नियंत्रणात येण्यास मदत मिळते. तसंच अतिरिक्त चरबी आवळा शरीरामध्ये जमू देत नाही. (Health)

चयापचयाची क्रिया तुम्हाला व्यवस्थित करण्यासाठी आवळा पावडरचा उपयोग होतो. तुम्ही नियमित कोमट पाण्यातून आवळा पावडर मिक्स करून प्यायल्यास तुमचा पचनक्रियेचा त्रास नक्कीच दूर होतो. तसंच वजनही नियंत्रणात राहते.

Amla Powder Benefits
Sacred Fig Benefits : बहुगुणी पिंपळाच्या पानाचे आरोग्यासाठी अनेक फायदे !

पचनक्रिया उत्तम राहते -

आवळ्याला एक आदर्श फळच म्हटले जाते. कारण यामध्ये अनेक गुण असून शरीरासाठी याचे अनेक फायदे होतात. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पचनक्रिया उत्तम होते. पचनक्रिया उत्तम झाली तर आपोआपच वजन कमी होण्यास सुरूवात होते.

वास्तविक यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्यामुळे त्रास कमी होतो. फायबर पचनक्रिया चांगली करण्यास आणि बद्धकोष्ठासंबंधी त्रास कमी करण्यास मदत करते. त्यामुळे आवळ्याच्या पावडरमुळे पचनक्रिया उत्तम होऊन अन्य त्रासापासून सुटका मिळते.

Amla Powder Benefits
Oil Benefits : बेंबीत 'हे' तेल घाला अन् प्रजनन क्षमता वाढवा !

लिव्हर निरोगी ठेवते -

अनेक अँटिबायोटिक आणि औषधांच्या गोळ्या अथवा सतत दारूचे सेवन हे लिव्हरमध्ये अनेक विषारी पदार्थांचे निर्माण करते.

पण तुम्ही नियमित आवळा पावडरचा समावेश आपल्या आहारात करून घेतला तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच तुमचे लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी याची मदत मिळते.

हृदय स्वास्थ्यासाठी

एका शोधामध्ये सांगितल्यानुसार आवळ्याची पावडर हृदय निरोगी राखण्यास मदत करते. याशिवाय याचा उपयोग हायपोलिपिडेमिक एजंट स्वरूपातही होतो.

यामुळे रक्तदाबासारख्या रोगांशी लढा देणे सोपे होते आणि कोरोनरी आर्टरी डिसीज अर्थात धमन्यांच्या रोगाविरोधात सुरक्षा मिळते. यामुळे हृदय रोगापासून तुम्हाला दूर राहता येते आणि हृदयाची काळजीही अधिक चांगल्या पद्धतीने घेता येते.

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी -

रोज आवळ्याचे सेवन हे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असून इम्यूनोमॉड्युलेटरी गुण अधिक प्रमाणात असतात.

ज्यामुळे प्रतिकारकशक्ती वाढते आणि आपल्याला रोगांपासून दूर राहण्यास मदत मिळते. तसंच तुम्ही नियमित आवळ्याच्या पावडरचे सेवन केल्यास अनेक रोगांपासून तुम्ही दूर राहू शकता. प्रतिकारकशक्ती अधिक वाढण्यासाठी याचा उपयोग होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com