Sacred Fig Benefits : बहुगुणी पिंपळाच्या पानाचे आरोग्यासाठी अनेक फायदे !

हिंदू धर्मात पिंपळाचे झाड शुभ मानले जाते.
Sacred Fig Benefits
Sacred Fig BenefitsSaam Tv

Sacred Fig Benefits : हिंदू धर्मात पिंपळाचे झाड शुभ मानले जाते. या झाडाची पूजा केल्यास पापांची समाप्ती होते आणि माता लक्ष्मीची कृपा होते असे मानले जाते. आयुर्वेदातही या झाडाला औषध (Medicine) मानतात. आणि या झाडाची पाने अनेक प्रकारचे आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी देखील वापरली जातात. पिंपळाची पाने त्वचेसाठी (Skin) चांगली असतात.

पोटदुखी -

पिंपळाच्या २-५ पानांची पेस्ट बनवून त्यात ५० ग्रॅम गुळ घालून मिश्रण बनवा आणि या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या बनवून दिवसातून ३-४ वेळा खा. पोटदुखीवर आराम मिळेल.

अस्थमा -

दम्याचा त्रास असलेल्या लोकांनी पिंपळाच्या पानांचे सेवन करावे. पिंपळाची पाने खाल्यास दम्यापासून आराम मिळतो. काही पिंपळाची पाने सुकवा. यानंतर त्यांना बारीक करा आणि पावडर तयार करा. त्यांनंतर ही पावडर दुधात उकळा आणि प्या. वाटल्यास या दुधामध्ये आपण मध किंवा साखर देखील घालू शकता. दिवसातून दोनदा हे प्यायल्याने दम्याचा त्रास कमी होईल.

Sacred Fig Benefits
Dragon Fruit Benefit : गुलाबी दिसणाऱ्या ड्रॅगन फ्रुट्चे आरोग्याला अनोखे फायदे !

साप चावल्यावर -

विषारी साप चावल्यावर पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस दोन थेंब घ्या आणि त्याची पाने चावून खा. त्यामुळे विषाचा परिणाम कमी होण्यास मदत होईल.

ताप बरा होण्यास फायदेशीर -

पिंपळाची पाने ताप काढून टाकण्यासही फायदेशीर ठरतात. जास्त ताप आल्यास, पिंपळाची पाने दुधासह प्या. ताप कमी होईल. काही पिंपळाची पाने घ्या आणि स्वच्छ करा. त्यानंतर गॅसवर एक ग्लास दूध गरम करण्यासाठी ठेवा. या दुधात स्वच्छ केलेली पाने टाका. आणि हे दूध उकळवून प्या.

Sacred Fig Benefits
Hug Benefits : प्रियजनांना मिठी मारा, अनेक फायदे मिळवा!

त्वचारोग -

पिंपळाची कोवळी पाने खाणे त्वचेच्या रोगांवर उपचारात्मक ठरते. पावलांना भेगा पडणे पिंपळाच्या पानांचा रस भेगा पडलेल्या पावलांवर लावणे, लाभदायी ठरते.

रक्ताची शुद्धता -

१-२ ग्रॅम पिंपळ बीज पावडरमध्ये मध मिसळून रोज दोन वेळा घेतल्याने रक्त शुद्ध होते.

बद्धकोष्ठता -

पिंपळाची ५-१० फळे रोज खाल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येवर आराम मिळतो.

डोळ्यांचे दुखणे -

पिंपळाची पाने दुधात बुडवून डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांचे दुखणे कमी होते.

दातदुखी पासून आराम -

काही लोकांना दात दुखण्याची तक्रार असते. दातदुखी असल्यास पिंपळचे स्टेम वापरा. पिंपळाचे स्टेमद्वारे दररोज दोनदा दात स्वच्छ करा. याशिवाय आपण पिंपळचे कच्चे मूळ देखील वापरू शकता.

फाटलेल्या टाचा होतील मुलायम -

फाटलेल्या मुरुडांच्या समस्यापासून मुक्त होण्यासाठी पिंपळचे पाने देखील प्रभावी आहेत. टाचा फुटल्या की त्यावर पिंपळाची पाने लावा. हे लावल्यास फाटलेल्या टाचा दुरुस्त होतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By : Shraddha Thik

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com