Diwali 2024: दिवाळीला लक्ष्मी पूजनानंतर नकळतही 'या' चुका करू नका, आल्यापावली लक्ष्मी परत जाईल

Diwali 2024: लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी सर्व विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा करतात. जाणून घेऊया लक्ष्मी पुजनानंतर कोणत्या चुका टाळल्या गेल्या पाहिजेत.
Laxmi Pujan 2024: दिवाळीला लक्ष्मी पूजनानंतर नकळतही 'या' चुका करू नका.
Diwali 2024saam tv
Published On

दिवाळीच्या सणाला आजपासून सुरुवात झाली आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण असून यामध्ये घरात सुख समृद्धी येते असं मानलं जातं. दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरात देवी लक्ष्मीची कृपा करण्यात येते. घरात सदैव सुख-समृद्धी राहो, अशी प्रत्येकाची इच्छा असते, यासाठी ही पुजा करण्यात येते. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी सर्व विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा करतात.

मात्र अनेकदा नकळत आपल्याकडून पुजेदरम्यान किंवा पुजेनंतर काही चुका घडतात. या चुकांचे परिणाम तुम्हाला आयुष्यभर भोगावे लागू शकतात. हे परिणाम टाळण्यासाठी लक्ष्मीपूजनानंतर काही चुका करणं टाळलं पाहिजे. जाणून घेऊया लक्ष्मी पुजनानंतर कोणत्या चुका टाळल्या गेल्या पाहिजेत.

Laxmi Pujan 2024: दिवाळीला लक्ष्मी पूजनानंतर नकळतही 'या' चुका करू नका.
Diwali 2024: दिवाळीत पैशांची कमी भासणार नाही, 'या' गोष्टींचे पालन करा

पुजेनंतर त्वरित मूर्ती हटवू नका

आपल्यापैकी काहीजण लक्ष्मी पूजनानंतर काही वेळात पुजेच्या ठिकाणच्या मूर्ती हटवतात. पूजेचं साहित्य, लक्ष्मी आणि गणेश मूर्ती रात्रीच काढून टाकल्या जातात. मात्र असं करणं पूर्णपणे चुकीचं आहे. धार्मिक मान्यतेनुसार, देवी लक्ष्मी पूजा केल्यानंतरच रात्री येते, त्यामुळे पूजा केल्यानंतर रात्री पूजास्थानाची स्वच्छता करणं योग्य नाही.

घरात वाद करू नका

दिवाळी हा सण आनंदाचा आणि समृद्धीचा सण मानला जात असून या दिवशी धनाची देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी पूजा करण्यात येते. माता लक्ष्मी नेहमी त्या घरात येते ज्या ठिकाणी शांततेचे वातावरण असतं. तसंच कुटुंबातील लोकांमध्ये प्रेम असतं. त्यामुळे पुजेनंतर घरात वादविवाद करू नका.

खोटं बोलू नका

असत्य मार्गाचा अवलंब करणं कधीही चुकीचं असतं. खोटं बोलणाऱ्या आणि फसवणाऱ्यांवर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. दिवाळी हा सण देवी लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामळे या लक्ष्मी पुजननंतर कधीही खोटं बोलू नये. यामुळे लक्ष्मी मातेचा कोप होतो असं म्हटलं जातं.

Laxmi Pujan 2024: दिवाळीला लक्ष्मी पूजनानंतर नकळतही 'या' चुका करू नका.
Dhanteras 2024: आजच्या दिवशी झाडूची खरेदी का केली जाते? झाडू विकत घेतल्यानंतर काय केलं पाहिजे?

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com