
दिवाळी हा सण प्रामुख्याने देवी लक्ष्मीला समर्पित आहे असे म्हंटले जाते. हा सण संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्य यांचे प्रतिनिधित्व करतो . लक्ष्मीसोबतच, अडथळे दूर करणारा भगवान गणेश, देवी सरस्वती आणि भगवान कुबेर या देवतांचाही उत्सवादरम्यान सन्मान केला जातो. मग या शुभ सणाला कोणत्या चुका चुकुनही करायच्या नाहीत हे जाणून घेणे महत्वाचे आहे. चला तर जाणून घेवू धन-संपत्ती देणाऱ्या गोष्टींची पुजा केल्याने काय फायदा होतो आणि कोणत्या चुका टाळाव्या.
2024 मधील दिवाळी बुधवारी 31 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. या वर्षी दिवाळी नक्की कोणत्या तारखेला साजरी करायची याबद्दल अनेकांना खात्री नाही, त्यामुळे हा गोंधळ दूर करूया. 31 ऑक्टोबर 2024 रोजी लक्ष्मीपूजन केले जाईल, कारण त्या दिवशी संध्याकाळी अमावस्या चंद्र दिसेल. हा सण 'अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजयाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो.
दिवाळीला पुढील गोष्टी करणे टाळा.
हत्थाजोडी हे झाडाचे मूळ आहे. ज्याचा आकार माणसाच्या जोडलेल्या हातांसारखा असतो. ते चिन्ह तुम्ही व्यवस्थित ठेवले पाहिजे. तुम्ही ते चिन्ह दिवाळीच्या रात्री तिजोरीत ठेवल्याने धनलाभ होतो.
स्फटीक श्रीयंत्र कुठेही ठेवू नका. स्फटीक श्रीयंत्र दिवाळीच्या रात्री देवाऱ्यात ठेवल्याने पैशाची कमी भासत नाही.
एकाक्षी नारळ हे लक्ष्मीचे रुप मानले जाते. हा नारळ पुजेनंतर फेकून देवू नका. तुम्ही तो नारळ देवाऱ्यात ठेवावा. त्याने आर्थिक लाभ होतो.
नागकेशर तुम्ही दिवाळीच्या रात्री चांदीच्या डब्यात मध मिसळून नागकेशर ठेवल्यास तुम्हाला आर्थिक लाभ होवू शकतो.
काळी हळद खुप महत्वाची आहे. दिवाळीच्या रात्री काळी हळद पिवळ्या कापडात चांदीच्या नाण्यासोबत बांधून आपल्या तिजोरीत ठेवल्यास संपत्ती मिळते.
कमलगट्टा हा दिवाळीच्या दिवशी आपल्या तिजोरीत ठेवल्याने धनाची प्राप्ती होते.
गोमती चक्राचा वापर सुद्धा तुम्ही दिवाळीत करु शकता. तीन गोमती चक्र, काळी हळद आणि चांदीची नाणी पिवळ्या कापडात बांधून ठेवू शकता.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
Written By: Sakshi Jadhav