Early cancer symptoms: ८० टक्के कॅन्सर पेशंट या ७ लक्षणांकडे दुर्लक्ष करतात; शरीरातील हे बदल वेळीच ओळखा

Early warning signs of cancer in daily life: सतत थकवा, गाठ, वजन घटणं किंवा त्वचेतील बदल यांसारखी सामान्य वाटणारी लक्षणं कॅन्सरचे सुरुवातीचे संकेत असू शकतात. तज्ज्ञांच्या मते या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
Cancer detection prenatal stage
Cancer detection prenatal stagesaam tv
Published On

आपल्या शरीरात कोणताही बिघाड झाला तरी शरीर आपल्याला त्याचे संकेत देत असतं. सतत येणारा थकवा, भूक लागण्यामध्ये होणारे बदल किंवा पोटातील वेदना या लक्षणांकडे आपण अनेकदा सामान्य समस्या म्हणून पाहतो. हा त्रास ताण, धावपळ किंवा वाढतं वय यामुळे होतो असं वाटतं.

जर तुम्हालाही ही लक्षणं दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. याचं कारण म्हणजे ही लक्षणं गंभीर आजारांबाबत तुम्हाला इशारा देत असतात. यामध्ये कॅन्सरसारखे गंभीर आजार देखील लपलेले असतात.

Cancer detection prenatal stage
Early signs heart attack face: हार्ट अटॅक येण्यापूर्वी चेहऱ्यामध्ये दिसतात ३ मोठे बदल; लक्षणं दिसताच डॉक्टरांची मदत घ्या

पंजाबमधील १५ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या क्लिनिकल आणि रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. आंचल अग्रवाल यांनी सांगितलंय की, सुमारे ८० टक्के कॅन्सरचे रुग्ण सुरुवातीची लक्षणं ओळखण्यात चूक करतात. सामान्यपणे त्यांच्याकडून या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं. उशीर होण्यापूर्वी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं हे महत्त्वाचं आहे.

कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं

अनेकांना असं वाटतं की, कॅन्सर हा कोणत्याही लक्षणांशिवाय आपल्या शरीरात पसरत असतो. मात्र डॉ. आंचल यांच्या सांगण्यानुसार, खरं तर ८० टक्के कॅन्सरच्या रुग्णांमध्ये सुरुवातीची लक्षणं दिसतात. मात्र ही लक्षणं खूपच सामान्य असली तरी लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात. ‘हे तर नॉर्मल आहे’ असं समजून त्याला गांभीर्याने घेतलं जात नाही. आणि जेव्हा त्यांनी त्याला गांभीर्याने घेतलं जातं तेव्हा फार उशीर झालेला असतो.

त्या पुढे सांगतात, कॅन्सरची सुरुवातीची अनेक लक्षणं अगदी किरकोळ किंवा रोजच्या त्रासासारखी वाटू शकतात. त्यामुळे त्याकडे सहजपणे दुर्लक्ष केलं जातं. पण आपल्या शरीरात होणारे बदल लक्षपूर्वक पाहणं आणि योग्य वेळी पाऊल उचलणं यामुळे मोठा फरक पडतो.

Cancer detection prenatal stage
Heart Attack Warning Signs: शरीरात 'हे' 5 मोठे बदल अचानक दिसले तर समजा हार्ट अटॅक येणारे; दुर्लक्ष करूच नका

सामान्य वाटणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

  • विश्रांती घेतल्यानंतरही न कमी होणारा सततचा थकवा

  • शरीराच्या कोणत्याही भागात वेदना

  • त्वचेवर किंवा तीळ यामध्ये बदल होणं

  • नवीन गाठ, रक्तस्राव होणं

  • अचानक आणि कारण नसताना वजन कमी होणं

  • शरीरात कुठेही गाठ किंवा सूज जाणवणं

  • दीर्घकाळ टिकणारा खोकला किंवा आवाज बसणं

Cancer detection prenatal stage
Heart Disease: आता घर बसल्या तुम्हाला समजेल की हृदयाच्या धमन्या ब्लॉक झाल्यात; पाहा या ४ सोप्या गोष्टी

डॉ. आंचल यांनी असंही सांगितलंय की, ही लक्षणं किरकोळ वाटली तरी शरीर आपल्याला काही इशारे देत असतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. शरीराचे संकेत ऐका, सतत दिसणारे बदल लक्षात घ्या आणि वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com