Dengue Infection : मच्छरांमुळे तुम्हालाही डेंग्यूची लागण झालीये? मग, या गोष्टी चुकूनही करू नका

Don't do These Mistake in Dengue Infection : डेंग्यू झाल्यावर सुद्धा काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची असते. त्याचीच माहिती आज जाणून घेऊ.
Don't do These Mistake in Dengue Infection
Dengue InfectionSaam TV
Published On

पावसाळा अनेकांचा आवडता ऋतू आहे. उन्हापासून आणि गरमीपासून पावसाळ्यात आपल्याला थंडावा मिळतो. मात्र त्यासह मच्छर आणि विविध साथीचे आजारही पसरतात. पावसाळ्यातला कॉमन आजार म्हणजे डेंग्यू. या आजारापासून स्वत:चा बचाव व्हावा यासाठी विविध टिप्स फॉलो केल्या जातात. मात्र हा आजार झाल्यावर सुद्धा काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची असते. त्याचीच माहिती आज जाणून घेऊ.

Don't do These Mistake in Dengue Infection
Dengue Patients : धाराशिवच्या पांगरदरवाडीत डेंग्यूची साथ; महिनाभरात २५ रुग्ण पॉझिटिव्ह

प्लेटलेट कमी होणे

डेंग्यूची लागण झालेल्या व्यक्तीला भरपूर ताप येतो. तसेच याने शरीरातील प्लेटलेट सुद्धा कमी होतात. प्लेटलेट कमी झाल्यातरी अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. मात्र असे करणे तुमच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे प्लेटलेट कमी झाल्यास त्याकडे लक्ष दिले पाहिजे.

औषधं

काही व्यक्तींना आरोग्याबाबत थोडी माहिती असते त्यामुळे ते स्वत:च आपल्या आरोग्याची काळजी घेतात आणि औषधं घेतात. तर काही व्यक्ती पैशांची कमतरता असल्याने डॉक्टरांकडे जात नाहीत. त्याऐवजी युट्यूब किंवा विविध व्हिडिओ बघून स्वत:च स्वत:साठी औषधं खरेदी करतात. मात्र असे आपला आजार आणखी बळावण्याची शक्यता असते.

एस्पिरिन

डेंग्यूमध्ये काही व्यक्तींना जास्तप्रमाणात ताप येतो आणि अंगदुखी वाढते. त्यामुळे अशावेळी व्यक्ती एस्पिरिन किंवा इबुप्रोफेन ही औषधं घेतात. मात्र ही औषधे डेंग्यूच्या पेशंटने घेतल्यास शरीरात रक्ताच्या गाठी किंवा अन्य गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

डेंग्यू झाल्यावर या गोष्टी करा

डेंग्यूची लागण झाल्याचे समजताच आधी डॉक्टरांकडे जा. चेकअप करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या. त्यानंतर तुमच्या घरात किंवा आजुबाजूच्या परिसरात कुठे पाणी साठून राहत आहे ते तपासा. ती जागा स्वच्छ करा, कारण अशाच पाण्यात डेंग्यूचे मच्छर तयार होतात.

Don't do These Mistake in Dengue Infection
Dengue Patients : पावसाळा सुरू होताच अमरावती जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण; पाच दिवसात सहा रुग्ण सापडल्याने आरोग्य विभाग सतर्क

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com