
एसीमध्ये झोपताना भितीदायक स्वप्नं पडू शकतात.
खोलीत ऑक्सिजनची कमतरता स्वप्नांवर परिणाम करते.
अति थंड वातावरण झोपेची गुणवत्ता बिघडवते.
आजकाल बहुतेक लोकांना आरामात झोपायचं असेल तर ते एसीचा वापर करतात. थंडगार हवा झोप पटकन आणि छान लागते. पण अनेकदा लोक अशी तक्रार करतात की, एसीमध्ये झोपल्यावर विचित्र किंवा भितीदायक स्वप्नं पडतात. मग प्रश्न पडतो की खरंच एसी आणि भयानक स्वप्नांचा काही संबंध आहे का?
डॉ. योगेश शर्मा सांगतात की, आपली झोप ही थेट आपल्या शरीराच्या तापमानावर आणि आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून असते. एसीमुळे खोलीचं तापमान खाली येतं आणि त्यामुळे झोप पटकन लागते. पण जर तापमान खूपच कमी झालं, तर शरीर अस्वस्थ होतं आणि मेंदूवर परिणाम होतो. याचा थेट परिणाम "रेपिड आय मूव्हमेंट" या अवस्थेवर होतो, जी अवस्था म्हणजेच आपण स्वप्नं पाहतो ती वेळ असते.
पूर्णपणे बंद खोलीत एसी सुरू ठेवल्यावर ताजी हवा आत-बाहेर फिरत नाही. त्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि झोपेत विचित्र किंवा भितीदायक स्वप्नं पडतात.
शरीर खूप गार झालं तर मेंदूला त्रास होतो आणि झोपेची गुणवत्ता बिघडते. त्यामुळे निगेटिव्ह स्वप्नं पडू शकतात.
एसीमुळे शरीर आरामशीर होतं, पण जर मनात आधीपासूनच ताण असेल तर थंड वातावरण मिळून मेंदू भितीदायक स्वप्नं निर्माण करू शकतो.
डॉ. शर्मा सांगतात की, प्रत्येक वेळी वाईट स्वप्नं पडण्यामागे एसीच कारणीभूत नसतो. कधी कधी सततचा ताण, नैराश्य, झोपण्यापूर्वी मोबाइलवर वेळ घालवणं किंवा जड जेवण करणं हेसुद्धा मोठं कारण ठरतं. पण जर तुम्हाला रोजच एसीमध्ये झोपताना अशा स्वप्नांचा त्रास होत असेल, तर वातावरण हा एक महत्त्वाचा घटक असू शकतो.
एसीचं तापमान साधारण 26 डिग्रीवर ठेवा.
झोपताना खोलीत थोडीशी तरी हवा खेळती राहील याची काळजी घ्या.
रात्री जड जेवण किंवा कॅफीन टाळा.
झोपण्याआधी हलकं म्युझिक ऐका, ध्यान करा किंवा पुस्तक वाचण्याची सवय लावा.
एसीमध्ये भितीदायक स्वप्नं का पडतात?
थंड वातावरण, ऑक्सिजनची कमतरता आणि मेंदूवरील परिणामामुळे भितीदायक स्वप्नं पडतात.
एसीचे आदर्श तापमान किती असावे?
एसीचे आदर्श तापमान साधारण २६ डिग्री सेल्सिअस असावे.
बंद खोलीत एसी सुरू ठेवणे का हानिकारक आहे?
ताजी हवा न फिरल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासते आणि मेंदूवर परिणाम होतो.
वाईट स्वप्नांमागील इतर कारणे कोणती?
मानसिक ताण, जड जेवण, मोबाइलचा वापर आणि नैराश्य ही इतर कारणे आहेत
चांगली झोप मिळवण्यासाठी काय करावे?
हलकं जेवण, ध्यान, म्युझिक आणि खेळत्या हवेची व्यवस्था ठेवावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.