Benefits Of Wine : एक ग्लास वाईन प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो ? जाणून घ्या

Wine Benefit : तुम्ही एखाद्या गोष्टीचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला तर गोष्ट तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते.
Benefits Of Wine
Benefits Of WineSaam Tv
Published On

Disadvantage Of Drinking Wine : कोणत्याही गोष्टीचा वापर एका पर्याप्त प्रमाणात केल्यावर त्याचे चांगले फायदे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर तुम्ही एखाद्या गोष्टीचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला तर गोष्ट तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते.

दवा असो किंवा दारू, यांवरती देखील हा नियम लागू होतो. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, रोज एक ग्लास वाईन प्यायल्याने तुमच्या शरीरावर काय प्रभाव पडतो. रिसर्च सोबत समजून घ्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होणार आहे की नुकसान.

Benefits Of Wine
why is xxx written on the bottle of rum : RUM च्या बॉटलवर xxx का लिहले असते ? जाणुन घ्या

1. वाईनचे फायदे आणि नुकसान :

एका रिचर्सनुसार महिलांनी दिवसामधून एक ग्लास आणि पुरुषांनी एका दिवसामधून दोन ग्लास वाईन पिणे चांगले असते. यामुळे तुम्हाला काही स्वास्थ्य लाभ होऊ शकतो. हृदयरोग, स्ट्रोक, कॅन्सर (Cancer) यासारख्या आजारांना (Disease) वाईन कमी करते. अशातच जास्त प्रमाणात वाईनचे सेवन केल्याने याचा गंभीर परिणाम तुमच्या स्वास्थ्यावर पाहायला मिळतो.

2. वाईन जास्त प्यायल्याने काय होते ?

सामान्यरित्या स्वास्थ्य कारणांमुळे वाईटचे सेवन चांगले असते. जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त माहितीत असेल तर, त्याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या स्वास्थ्यावर पडू शकतो. त्यामुळे तुम्हाला हाय ब्लड प्रेशर (Blood Pressure), किडनी रोग कॅन्सर सारख्या आजारांना बळी पडावे लागू शकते. अशातच तुम्ही एखादं औषध खाल्लं आणि यासोबत तुम्ही वाईन प्यायली तर औषधांसोबत (Medicine) तुमच्या शरीरावर परस्पर प्रक्रिया करून स्वास्थ स्थिती गंभीर बनवू शकते.

Benefits Of Wine
Red Wine Benefits : रेड वाइनचे आरोग्याला अनेक फायदे, पिताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

3. रिसर्च काय म्हणते ?

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या एका कॉन्फरन्समध्ये प्रेझेंट केलेल्या एका रिसर्च रिपोर्टने दावा केला आहे की जेवणासोबत जर तुम्ही एक ग्लास वाईट पीत असाल तर तुमच्या शरीरातील टाईप टू डायबिटीसचा खतरा कमी होऊ शकतो. सोबतच अमेरिकी हेल्थ एजन्सी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या रिसर्च नुसार, एक ते दोन ग्लास वाईन पिणे जास्त घातक नसते. याशिवाय प्यायल्याने तुमच्या आरोग्यावर कोणता प्रभाव पडतो यावर अनेक अध्ययन केले आहेत. काही शोध सांगतात की, वाईनमध्ये उपलब्ध असणारे अँटिऑक्सिडेंट विशेष रूपामध्ये रेड वाइनमध्ये असणारे अँटिऑक्सिडेंट हे हृदयरोग, कॅन्सर आणि शरीराच्या विरोधात असलेल्या अनेक आजारांवर सुरक्षात्मक प्रभाव पाडते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com