Tulsi Vivah: तुळशीचं लग्न कधी आहे? कधी आहे मुहूर्त? पाहा या दिवसाचे खास नियम

Tulsi Vivah 2024: संपूर्ण भारतात तुळशी विवाह सण साजरा करण्यात येणार आहे. जाणून घेऊया तुळशी विवाहचा शुभ मुहूर्त आणि नियम.
Tulsi Vivah
Tulsi VivahYANDEX
Published On

हिंदू धर्मात तुळशी विवाह सणाला खूप महत्त्व आहे. तुळशी विवाह सण दिवाळीसणा नंतर साजरा केला जातो. हा सण कार्तिक महिन्यातील शुल्क पक्षात संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येणार आहे. घरात तुळशी विवाहाची पूजा केल्याने सुख-समृद्धी टिकून राहत असते. या दिवशी एकादशी असल्याने तुळशी विवाह सण संध्याकाळी साजरा करण्यात येतो. या दिवशी तुळशीचा विवाह भगवान विष्णूच्या शालिग्राम रुपाशी करण्यात येतो. जाणून घेऊया तुळशी विवाहाचे काही नियम, शुभ मुहूर्त आणि साहित्य.

Tulsi Vivah
Life Success Tips : शहाणे असाल तर आयुष्यातील 'या' गोष्टी कधीच कुणालाही सांगू नका, अन्यथा पश्चाताप होईल

तुळशी विवाह कधी आहे?

धार्मिक मान्यतेनुसार तुळशी विवाह सण १३ नोव्हेंबरला आहे. या दिवशी घरोघरी तुळशी विवाहची पूजा करण्यात येणार आहे. तुळशी मातेचे लग्न शलिग्रामशी लावण्यात येते. शालिग्राम देवता भगवान विष्णूचे प्रतीक मानला जातो. म्हणून त्यांचा विवाह वृंदा म्हणजे तुळशीशी करण्यात येतो. तुळशी विवाहचा शुभ मुहूर्त १२ नोव्हेंबर संध्याकाळी ५:२९ ते ७:५३ पासून १३ नोव्हेंबर दुपारी १:०१ मिनिटापर्यंत आहे.

नियम

तुळशी विवाहाच्या दिवशी नागरिकानीं सकाळी लवकर उठून स्नान करावे. यानंतर नवीन कपडे परिधान करुन भगवान विष्णूची पूजा करावी. यानंतर तुळशीविवाह लग्नाचे आयोजन भगवान विष्णूशी करावे. हे सगळं करत असताना तुळशी आणि भगवान विष्णूला देखील सजवा. तुम्ही भगवान विष्णूला कापसाचे पिवळे कपडे तयार करुन त्याने सजवू शकता.

साहित्य

तुम्ही तुळशी विवाहच्या पूजास्थळी फुले, हार, फळे, पंचामृत, धूप, अगरबत्ती, तुळशीसाठी श्रृगांर, मिठाई, तुपाचा दिवा, आंब्याची पाने, केळीचे दोन खांब इत्यादी ठेवू शकता. याबरोबर घरात नवीन तुळशीचे रोप घेऊन या. घरात नवीन तुळशीचे रोप असणे शुभ मानले जाते.

Tulsi Vivah
Married Life Tips : सुखी संसारासाठी वापरा''२-२-२''हा मंत्र

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com