

उन्हाळ्यात घाम जास्त येणं ही अगदी सामान्य गोष्ट आहे. मात्र अनेकांना अंडरआर्म्समधून (काखेतून) येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास होतो. रोज आंघोळ करून, परफ्यूम किंवा डिओडरंट वापरूनही काही तासांत पुन्हा घामाचा वास यायला लागतो. अशा वेळी फक्त प्रोडक्ट्स वापरण्यापेक्षा आंघोळ करताना एक छोटासा बदल केला तर या समस्येवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकते.
आपल्या शरीरात असलेल्या स्वेट ग्लँड्समधून घाम तयार होतो. काखेच्या भागात 'अपोक्राइन' प्रकारच्या घामग्रंथी असतात. या भागातून येणारा घाम त्वचेवर असलेल्या बॅक्टेरियांच्या संपर्कात आला की त्यातून दुर्गंधी निर्माण होते. याशिवाय सतत राहणारा ओलावा, खूप घट्ट कपडे घालणं, हार्मोन्समधील बदल आणि शरीराची योग्य स्वच्छता न राखणं यामुळेही ही समस्या अधिक वाढू शकते.
अंडरआर्म्समधून वारंवार दुर्गंधी येत असेल तर आंघोळ करताना नेहमीचा साबण वापरण्याऐवजी अँटीबॅक्टेरियल किंवा मेडिकेटेड बॉडी वॉश वापरावा. अशा प्रकारचा बॉडी वॉश त्वचेवरील दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांची संख्या कमी करण्यास मदत करू शकतो. मात्र बॉडी वॉश निवडताना तो आपल्या त्वचेच्या प्रकाराला योग्य आहे का, याची खात्री करून घ्या.
बेंझॉयल पेरॉक्साइड (Benzoyl Peroxide) असलेला बॉडी वॉश या समस्येसाठी फायदेशीर ठरू शकतो. हा बॉडी वॉश अंडरआर्म्सवर लावल्यानंतर तो साधारण २ ते ४ मिनिटं तसाच राहू द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. यामुळे दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांचं प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते आणि घामाच्या वासाची समस्या काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकते.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.