
What are the effect of eating hot food : आपल्यापैकी अनेकांना गरमागरम जेवण खायला आवडते. कोणत्याही ऋतूत ते अन्न गरम करुन खातात. ही सवय चांगली जरी असली तरी आरोग्यासाठी तितकीच घातक आहे.
उन्हाळ्यात तुम्हाला अधिक गरम केलेले पदार्थ खाण्याची सवय असेल तर त्याचे तोटे देखील माहीत असायला हवे. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर
1. जीभ जळण्याचा धोका
उन्हाळ्यातही गरम अन्न खाल्ले तर जीभ जळण्याचा धोका असतो. इतकंच नाही तर खूप गरम खाल्ल्याने दातांनाही इजा होऊ शकते. बरेचदा खूप गरम अन्न खाल्ल्याने टाळू जळतात आणि त्यावर फोड येतात किंवा त्वचा (Skin) फाटते. आरोग्य (Health) तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जास्त गरम अन्न खाल्ल्याने घशात सूज येऊ शकते आणि अन्ननलिकेमध्ये समस्या देखील उद्भवू शकतात.
2. दातांना नुकसान
हेल्थ एक्स्पोर्टच्या मते खूप गरम किंवा खूप थंड अन्न खाणे दातांसाठी हानिकारक असू शकते. खूप गरम अन्न खाल्ल्याने दातांमधील इनॅमल खराब होण्याची शक्यता असते. यामुळे दातांचे आरोग्य बिघडते तसेच दातांच्या सौंदर्यावरही वाईट परिणाम होतो.
3. आतड्यांना होऊ शकते इजा
उन्हाळ्यात गरम अन्न खाल्ल्याने आतड्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते. जेव्हा खूप गरम अन्न पोटात (Stomach) जाते तेव्हा ते जास्त काळ थंड होत नाही आणि त्यामुळे आतड्यांनाही जळजळीचा सामना करावा लागतो.
4. पोटाचा त्रास वाढतो
उन्हाळ्यात आधीच पोटाची उष्णता जास्त असते, अशा परिस्थितीत गरम अन्न खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पोटाची त्वचा जळू शकते किंवा फोड आणि पोटात जळजळ होण्याचा धोका वाढतो. या ऋतूमध्ये शरीरात जे काही जाते, ते शरीर आधी त्याचे तापमान थंड करते आणि नंतर ते पचवते. अशा परिस्थितीत, गरम अन्न खाल्ल्यानंतर, उन्हाळ्याच्या हंगामात शरीराला थंड होण्यासाठी जास्त मेहनत आणि वेळ लागतो आणि या काळात अन्न पचण्यास खूप त्रास होतो. अशा स्थितीत पोटात जळजळ, आम्लपित्त, मळमळ आणि उलट्या होण्याचा धोका असतो.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.