Astro Tips For Money: शुक्रवारच्या रात्री करा 'हे' उपाय; देवी लक्ष्मीच्या कृपेने घरातील तिजोरी भरणार

Astrology Remedies for Money: ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्रवारी केलेले काही सोपे उपाय तुम्हाला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकतात आणि तुमच्या घरात धन-समृद्धी आणू शकतात. खासकरून, शुक्रवारी रात्री केलेले उपाय अधिक प्रभावी मानले जातात.
Astrology Remedies for Money
Astrology Remedies for Moneysaam tv
Published On
Summary
  • शुक्रवार हा लक्ष्मीदेवीला अर्पित दिवस आहे.

  • संध्याकाळची पूजा धनवृद्धीसाठी फलदायी आहे.

  • कौड्यांचा उपाय पैशाचा प्रवाह वाढवतो.

शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला अर्पण मानला जातो. लक्ष्मीदेवीला धन आणि समृद्धीची देवी मानले जाते. म्हणूनच या दिवशी केलेले उपाय धनप्राप्तीसाठी, वैभव आणि ऐश्वर्य वाढवण्यासाठी अतिशय फलदायी मानले जातात. जर तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर शुक्रवारच्या रात्री काही सोपे पण प्रभावी ज्योतिषीय उपाय करून पाहू शकता.

संध्याकाळची पूजा

शुक्रवारी सकाळच्या पूजेसोबतच संध्याकाळी विशेष पूजा करण्याचा मोठा लाभ होतो. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत आणि घरात लक्ष्मीमातेची प्रतिमा स्थापित करून पूजन करावे. त्यांच्या समोर तुपाचा दिवा लावावा. त्याचप्रमाणे अक्षता, फुले आणि श्रुंगारसामग्री अर्पण करावी. असं केल्याने घरात सकारात्मकता वाढतं आणि लक्ष्मीमातेची कृपा मिळतं.

Astrology Remedies for Money
Surya Grahan: 4 दिवसांनंतर शनीचं गोचर आणि सूर्यग्रहण होणार एकत्र; 'या' राशींच्या व्यक्तींचं नशीब पाटलणार

कवड्यांचा उपाय

धनलाभासाठी कवड्यांचा उपाय विशेष मानला जातो. शुक्रवारच्या रात्री ५ कौड्या घेऊन त्या लाल कपड्यात बांधाव्यात आणि लक्ष्मीमातेच्या चरणी अर्पण कराव्यात. दुसऱ्या दिवशी या कौड्या आपल्या तिजोरीत किंवा ज्या ठिकाणी पैसे ठेवता तिथे ठेवा. हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य दूर होतं आणि पैशांचा प्रवाह वाढतो.

Astrology Remedies for Money
Solar eclipse: वर्षातील दुसरे सूर्यग्रहण कधी लागणार? भारतात दिसणार हा हे ग्रहण? जाणून घ्या वेळ आणि नियम

तांदळाचा उपाय

शुक्रवारी रात्री एक मूठ तांदूळ लाल कपड्यात बांधून घराच्या एखाद्या कोपऱ्यात लपवून ठेवा. हा उपाय गुप्तपणे करावा. असं केल्याने घरात प्रगतीचे मार्ग मोकळे होतात आणि धनलाभाचे योग निर्माण होतात.

Astrology Remedies for Money
Surya Grahan 2025: पितृ पक्षात लागणार यावर्षीचं शेवटचं सूर्यग्रहण; न्यायाधीश शनी बनवणार शक्तीशाली योग

श्रीयंत्राची पूजा

शुक्रवारच्या दिवशी श्रीयंत्राची स्थापना करून पूजा केल्यास लक्ष्मीमातेची विशेष कृपा मिळते. श्रीयंत्राचे पूजन हे संध्याकाळी किंवा रात्री कधीही करता येते. नियमितपणे श्रीयंत्राची पूजा केल्याने घरातील आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला होतो आणि संपत्तीमध्ये वाढ होते.

Q

शुक्रवारचा दिवस कोणाला अर्पित आहे?

A

शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीला अर्पित मानला जातो.

Q

लक्ष्मीपूजेसाठी कोणता दिवा लावावा?

A

लक्ष्मीपूजेसाठी तुपाचा दिवा लावावा.

Q

धनलाभासाठी कोणत्या वस्तूचा उपाय करावा?

A

धनलाभासाठी ५ कौड्यांचा उपाय करावा.

Q

तांदळाचा उपाय कोठे ठेवावा?

A

तांदळाचा उपाय घराच्या कोपऱ्यात लपवून ठेवावा.

Q

श्रीयंत्राची पूजा करण्याचा काय फायदा आहे?

A

श्रीयंत्राची पूजा आर्थिक उन्नती आणि संपत्तीवाढीस मदत करते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com