Holi 2022
Holi 2022Saam Tv

Holi 2022: होळीला हे सोपे वास्‍तू उपाय करा, घरात सुख-समृद्धी नांदेल

होळी हा रंगांचा सण आहे. या दिवशी देवतांना आवडणाऱ्या रंगांची रांगोळी काढणे शुभ मानले जाते
Published on

मुंबई: होळी (Holi 2022) हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही उपाय केल्यास प्रगती होते आणि घरात सुख-शांतीचे वातावरण राहते. तर दुसरीकडे, वास्तुशास्त्रानुसार या दिवशी काही उपाय केले तर घरात कधीही पैशांची कमतरता राहात नाही. होळीच्या दिवशी वास्तू उपाय केल्याने वास्तू दोष दूर होतात, अशी मान्यता आहे.

वास्तुदोषाचा तुमच्या नशिबावरही परिणाम होतो. खूप मेहनत करुनही प्रगती होत नाही. असे दोष दूर करण्यासाठी तुम्ही होळीच्या शुभदिनी काही उपाय करु शकता.

Holi 2022
Holi 2022: त्वचेसंबंधी 'या' समस्या असतील तर होळीच्या रंगांपासून दूर राहा...

🟣होळी (Holi) हा रंगांचा सण आहे. या दिवशी देवतांना आवडणाऱ्या रंगांची रांगोळी काढणे शुभ मानले जाते. देवी लक्ष्मीला (Lakshmi) प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर पिवळ्या आणि लाल रंगाने रांगोळी काढा. वास्तूमधील रंगांशी संबंधित उपायांचा अवलंब करुन अनेक प्रकारचे वास्तू दोष दूर केले जाऊ शकतात. अशा रंगांच्या रांगोळ्या काढल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांवर आशिर्वादाचा वर्षाव करते, अशी मान्यता आहे.

🟠 वास्तुदोषांमुळे (Vastu) पती-पत्नीमध्ये सामंजस्य असतानाही अनेकदा वाद होतात. हे वाद दूर करण्यासाठी होळीच्या दिवशी बेडरुममध्ये राधा-कृष्णाचे चित्र लावावे. आपण घरामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधाच्या मूर्ती देखील स्थापित करु शकता.

🔵 होळीच्या दिवशी तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात सूर्यदेवाचे चित्र (Photo) लावू शकता. उगवत्या सूर्याचे चित्र लावल्याने तुम्हाला खूप फायदा होईल. हे चित्र लावताना तुम्हाला दिशेची विशेष काळजी घ्यावी लागेल. वास्तूनुसार ऑफिस किंवा दुकानात उगवत्या सूर्याचे चित्र पूर्व दिशेलाच लावावे.

🔴 घर आणि कुटुंबातील नकारात्मकता दूर करण्यासाठी, होळीच्या दिवशी तुम्ही घरात झाडे आणि रोपटे लावू शकता. वास्तुशास्त्रानुसार रोपं लावूनही घरातील दोष दूर होऊ शकतात. असे केल्याने घरात सकारात्मकता राहते.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com