Relationship Tips: जोडीदाराच्या या सवयींकडे करु नका दुर्लक्ष, पडू शकता टॉक्सिक रिलेशनशीपला बळी

Toxic Relationship : जोडीदाराच्या अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला पटत नाही.
Relationship Tips
Relationship TipsSaam Tv
Published On

How To Know If Your Partner Is Toxic : आपलं नातं हे दृढ होण्यासाठी आपण अधिक प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपण इतर अनेक गोष्टीत तडजोड करतो परंतु, जोडीदाराच्या अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला पटत नाही.

जर तुमच्या नात्यात (Relationship) विश्वास असेल पण त्यात अति पजेसिव्हपणा असेल तर नातं तुटण्याचा मार्गावर जाते. आपल्या जोडीदाराच्या काही सवयींकडे आपण वेळोवेळी दुर्लक्ष करतो परंतु, या गोष्टी आपल्या मनात घर करुन जातात व अचानक नात्याच्या आड या गोष्टी येऊ लागतात. त्यासाठी जोडीदाराच्या (Partner) या सवयींकडे दुर्लक्ष करु नका. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

Relationship Tips
Cheating in Relationship : रिलेशनशीपमध्ये पुरुषांपेक्षा महिला अधिक का असतात विश्वासघाती...

टॉक्सिक रिलेशनशिपची लक्षणेः

1. संवाद कमी होणे

कोणत्याही नात्याला टिकवण्यासाठी गरजेचा असतो तो संवाद. जर नात्यात संवाद नसेल तर नात्यात गैरसमज होण्याची शक्यता असते. जर तुमचा जोडीदार तुमच्या सोबत संवाद साधत नसेल, भांडण सोडवण्यासाठी संवाद साधण्यास पुढाकार घेत नसेल, संवाद साधताना नेहमी वाद होत असतील व ते निकोपाला जात असतील, वादात फक्त आरडा-ओरड होत असेल, तर तुमचा जोडीदार तुमच्या नात्यात समाधानी नाही असल्याचे समजावे. हे टॉक्सिक नात्याचे लक्षण आहे.

Relationship Tips
Relationship : तुमचीही गर्लफ्रेंड असेच नखरे करते का?

2. तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे

नात्यात एकमेकांची काळजी (Care) घेणे हे दोन्ही व्यक्तींचे कर्तव्य असते. नात्यात एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या समस्या ऐकूण घेणे आणि त्यांना सल्ला देणे हे सामान्य असते. परंतु जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला धाकात, नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे एक टॉक्सिक जोडेदाराचे लक्षण ठरते. तुम्ही काय करावे, कोणते कपडे घालावेत इ. निर्णय तुमच्या परवानगीविना घेऊ लागतो तेव्हा वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

3. सहवासाचा अभाव

जोडपी एकमेकांचा आधार असतात. त्यांच्यातील प्रेम परस्पर समंजसपणा आणि सहवासावर अवलंबून असते. पण जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला समजून घेण्याऐवजी तुमच्या चुकांना वेळोवेळी दाखवून देत असेल किंवा नकारात्मक गोष्टी बोलत असेल, तर समजून जा की त्याचे तुमच्यावरील प्रेम संपत चालले आहे. टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये तुमचा जोडीदार तुम्हाला साथ देत नाहीत.

Relationship Tips
Relationship Tips : लग्न करण्यापूर्वी होणाऱ्या पार्टनरला नक्की विचारा हे प्रश्न, आयुष्यभर टिकेल नातं !

4. शाब्दिक अत्याचार

तुमचा जोडीदार जर तुमच्यावर शाब्दिक स्वरुपात अत्याचार करत असेल, सतत नकारात्मक गोष्टी बोलणे, चुका दाखवून देणे, संशय घेणे, तुम्ही केलेल्या कामगिरीवर टोमणे मारणे अशा प्रकारचे वर्तन करत असेल तर तुमचा जोडीदार टॉक्सिक असून नाते विषारी झाल्याचे समजून जावे. जेव्हा नात्यात प्रेम संपून त्रास, वेदना आणि दुःख वाढते तेव्हा नात्याला अर्थ उरलेला नसून अशा नात्यातून वेळीच बाहेर पडणे तुमच्या भल्याचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com