Health News : पावसाळ्यात चुकूनही 'या' भाज्या खाऊ नका; थेट हॉस्पिटलमध्ये अॅडमीट व्हावं लागेल

Never Eat This Vegetables in Rainy Season : फक्त बाहेरचं खाऊन नाहीतर काही भाज्या खाल्ल्याने देखील पावसाळ्यात आपलं आजारपण वाढत जातं.
Never Eat This Vegetables in Rainy Season
Health NewsSaam TV
Published On

पावसाळ्या सुरू झाली की काही दिवस सुरूवातीला फार छान वाटतं. मात्र नंतर धो धो कोसळणाऱ्या पावसाने आपल्याला विविध आजार जडतात. पावसाळ्यात बाहेरचं खाऊनये असं सांगितलं जातं. मात्र तरीदेखील काही व्यक्ती बाहेरचं खातात आणि आजारी पडतात. फक्त बाहेरचं खाऊन नाहीतर काही भाज्या खाल्ल्याने देखील पावसाळ्यात आपलं आजारपण वाढत जातं.

Never Eat This Vegetables in Rainy Season
Vegetable Rates Increases: पावसाच्या हुलकावणीमुळे भाजीपाल्यांचे दर कडाडले; कांदा-बटाट्याचे दर दुप्पट, सर्वसामान्यांचं बजेट गडबडलं

पावसाळ्यात ओलावा आणि आद्रतेमुळे अनेक भाज्या खराब होतात. यामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश जास्त असतो. हिरव्या पालेभाज्यांना खूप जास्त प्रमाणात पाणी सहन होत नाही. ओलाव्याने भाज्या खराब होतात. तसेच या भाज्यांमध्ये विविध किटक, किडे सुद्धा तयार होतात. अशा भाज्या खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो.

या भाज्या खाऊ नका

पावसाळ्यात कोबी, फ्लॉवर, पालक, मेथी, शेपू या पालेभाज्या खराब होतात. हवेतील जास्त आद्रतेमुळे यात काही किटक तयार होतात. त्यामुळे या भाज्या खाताना त्या अगदी काळजीपूर्वक साफ करा. कारण माती आणि भाज्यांच्या पानात किटक लपलेले असतात.

हे आजार होतात

अशा भाज्यांचं सेवन केल्याने आपल्याला मळमळ होणे, पोट दुखणे, चक्कर येणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. शिवाय काहींना या भाज्यांचे सेवन केल्याने फूड पॉइजन देखील होण्याची शक्यता असते.

सॅलाडमधील फळभाज्या

जेवणात गाजर, मुळा, बीटरूट अशा जमिनीत उगवणाऱ्या फळभाज्या देखील पावसाळ्यात खराब होतात. त्यामुळे या फळभाज्या खाणे सुद्धा शक्यतो टाळा. फळभाज्या जास्त दिवस चांगल्या राहत नाहीत. त्या लवकर कुजतात. त्यामुळे फ्रिज किंवा रेफ्रिजरेटरमध्ये सुद्धा फळभाज्या जास्तवेळ ठेवू नये.

कडधान्य खा

पावसाळ्यात कडधान्य आपल्या आरोग्यासाठी योग्य असतात. कडधान भिजत ठेवून त्यांना मोड येऊ द्या. मोड आलेले कडधान्य आरोग्यासाठी उत्तम असतात. याचे सेवन केल्याने शरिराला जास्त प्रमाणात जिवनसत्व मिळतात.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही, पावसाळ्यात आहाराबाबद तुम्ही तज्ज किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

Never Eat This Vegetables in Rainy Season
Vegetable Price Hike News: भाजीपाला महागला! सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com