Monsoon health: हाय बीपी आणि शुगर लेवलचा किडनीवर होतो परिणाम? पावसाळ्यातील 'या' सवयी ठरतात धोकादायक

How monsoon affects kidney health: पावसाळ्यात बदललेली जीवनशैली, कमी व्यायाम, तळलेले पदार्थ आणि कमी पाणी पिण्यामुळे हाय ब्लड प्रेशर व मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये किडनीच्या समस्यांचा धोका वाढू शकतो. किडनीचे आरोग्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या.
Monsoon health
Monsoon healthsaam tv
Published On

पावसाळा म्हटलं की काही काळ गरमीपासून आराम मिळतो. मात्र हा ऋतु हाय ब्लड प्रेशर आणि मधुमेही रूग्णांसाठी फारसा चांगला मानला जात नाही. या ऋतुमध्ये हवेत आर्द्रता वाढते, शारीरिक हालचाल कमी होते, खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल होतो त्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. जर यावेली ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगरला नियंत्रणात ठेवलं नाही तर त्याचा थेट परिणाम किडनीवर होतो.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशर या दोन्ही समस्या हळू-हळू तुमच्या किडनीचं नुकसान करतात. पावसाळा असल्याने अनेक लोकं चालणं कमी करतात, तळलेल्या पदार्थांचं सेवन करतात, याशिवाय योग्य प्रमाणात पाण्याचंही सेवन करत नाहीत. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे ब्लड प्रेशर आणि शुगर लेवल बिघडू शकते. यामुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतोना दिसतो.

Monsoon health
Kidney stone symptoms: सतत पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका; किडनी स्टोन झाल्यावर शरीर देत असलेली ही 8 लक्षणं ओळखा

पावसाळ्यात का वाढते ब्लड प्रेशरची समस्या?

पावसाळा आला की अनेकांचं दिनचर्या पूर्णपणे बदलते. पाऊस असल्याने आपण घराबाहेर पडत नाही, व्यायाम कमी करतो. पावसाळ्याच्या गार वातावरणात काहीतरी गरम गरम खाण्याच्या इच्छेने तळलेले पदार्थ खातो. यामुळे ब्लड प्रेशर वाढू लागतं. ज्यांना ब्लड प्रेशरचा आधीपासून त्रास आहे त्यांनी नियमितपणे याची तपासणी केली पाहिजे.

मधुमेही रूग्णांनी काय घ्यावी काळजी?

मधुमेही रूग्णांना किडनी खराब होण्याचा धोका अधिक असतो. पावसाळ्याच्या दिवसात शीरिरीक हालचाल आणि खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्यामुळे ब्लड शुगर वाढण्याचा धोका अधिक असतो. दीर्घकाळ तुमची ब्लड शुगर जास्त राहिली तर किडनीच्या फिल्टरला नुकसान पोहोचू शकतं. ज्यामुळे किडनीची कार्यक्षमता कमी होऊ लागते.

Monsoon health
Blood pressure medication: रक्तदाबाची औषधं रोज घेऊनही बीपी नियंत्रणात येत नाही? डॉक्टरांनी सांगितलेली 'ही' ५ कारणं जाणून घ्या

कमी प्रमाणात पाणी पिण्याने वाढते समस्या

पावसाळ्यात आपल्याया तहान कमी लागते, त्यामुळे आपण पाणी देखील कमी पितो. मात्र शरीरात पाण्याची कमतरता झाल्यामुळे डिहायड्रेशन होतं. ज्याचा ताण तुमच्या किडनीवर येतो. हाय ब्लड प्रेशर आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींनी योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. जेणेकरून किडनीचं कार्य सुरळीत सुरु राहील.

कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल?

  • ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगरची नियमित तपासणी कराल

  • दररोज व्यायाम करा

  • तळलेले आणि मीठाचे पदार्थ अधिक खाऊ नका

  • पुरेशा प्रमाणात पाणी प्या

  • कोणतीही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करू नका

Monsoon health
Health Care Tips: तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर उजव्या बाजूला दुखतंय? 'या' गंभीर समस्येविषयी शरीर देत असलेले इशारे जाणून घ्या

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com