Diwali Recipe 2022 : दिवाळीच्या फराळात शेव, चिवडा, चकली, करंजी असे पदार्थ सर्वत्र बनविले जातात. मात्र दिवाळीच्या फराळात नेहमी चुकणारा पदार्थ हा अनारसे त्याचे प्रमाण चुकले की, पदार्थ फसतो. पण तो योग्य प्रमाणात कसा बनवायचा ? चला तर जाणून घेऊ यंदाच्या दिवाळीसाठी (Diwali) खुसखुशीत अनारसेची ही खास रेसिपी. (Latest Marathi News)
साहित्य :
(Rice) / तांदूळ 2 cups
Jaggery - 1 part of rice flour
गूळ - तांदूळ पिठी चा 1 भाग
Poppy seeds / खसखस
Oli for frying / तळण्यासाठी तेल
Ghee / साजूक तूप
अनारसे बनवण्यासाठी खास टिप्स :
तांदूळ जुने वापरावे, इंद्रायणी तांदूळ वापरू नये.
तांदूळ कमीत कमी 3 दिवस 3 रात्र संपूर्ण भिजत घालावेत
रोजच्या रोज तांदूळ मधील पाणी बदलावे
तांदूळ खूप कोरडा सुकवू नये किंवा अगदी ओला नसावा.
तांदूळ पीठ एकदम बारीक दळणे, आणि मैद्याचा चाळणी ने चाळून घ्यावे.
एका वाटीने तांदळाच्या पिठ 3 वाटी घेऊन त्याच वाटीने 1 वाटी गूळ घ्यावा.
गूळ जास्त झाल्यास अनारसे तेलात विरघळतात.
पीठ मळायला खूप जड जात असल्यास थोडेसे साजूक तूप / केळी मिसळावे. ( खूप जास्त नको)
अनारसे तळताना मंद आचेवर तळून घ्यावेत आणि चाळणी वर निथळत ठेवावेत.
कृती -
तांदळाच्या पिठ 3 वाटी घेऊन त्याच वाटीने 1 वाटी गूळ घ्यावा. मळून घ्या व लाडू सारखे गोळे तयार करा.
तयार गोळे हवाबंद डब्यात १ दिवस ठेवा. डब्याला बाहेरुन सुती कापडात गुंडाळून ठेवा
दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला मळून घ्या व पुन्हा हवाबंद डब्यात ठेवा
अनारसे बनवताना पिठाचे एकसारखे गोळे तयार करुन घ्या. एका वाटीत साजूक तूप घेऊन एका बाजून खसखसमध्ये फिरवून घ्या.
बोटाला साजूक तूप लावून बोटाने गोळा हळूहळू फिरवा. तेल गरम करुन मंद आचेवर तळून घ्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.