Diwali 2026 : दिवाळीत घराला रंग करताय? आरोग्याची काळजी घेण्यासाठी या गोष्टी नक्की पाळा

DIWALI HOUSE PAINTING HEALTH SAFETY TIPS : दिवाळीच्या साफसफाईत घराची रंगरंगोटी करताना वापरल्या जाणाऱ्या केमिकल्सचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नवीन रंगांसोबतच स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे.
DIWALI HOUSE PAINTING HEALTH SAFETY TIPS
DIWALI HOUSE PAINTING HEALTH SAFETY TIPSsaam tv
Published On: 

दिवाळीसाठी आपण सर्वजण घराची साफसफाई आणि रंगरंगोटी करतो.नवीन रंगामुळे घराला छान लूक मिळतो, पण या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या केमिकल्सचा तुमच्या आणि मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. रंगकाम करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे,हे जाणून घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

लेड-फ्री रंग निवडा

पेंट खरेदी करताना तो लेड-फ्री असल्याची खात्री करा. पेंट्समधील शिसे विशेषतः लहान मुलांच्या मेंदूच्या विकासावर अत्यंत घातक परिणाम करू शकते. थोड्याफार प्रमाणातही हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

DIWALI HOUSE PAINTING HEALTH SAFETY TIPS
Health Tips : जेवण करताना वारंवार जीभ दातात का अडकते? जाणून घ्या कारणे आणि आरोग्य टिप्स

घरात व्हेंटिलेशन ठेवा

रंगकामादरम्यान घरातील खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा, जेणेकरून पेंट्सचा उग्र वास आणि हवेतील केमिकल्सचे कण बाहेर जातील. हवेचा रोटेशन चांगला राहण्यासाठी एक्झॉस्ट फॅन देखील सुरू ठेवू शकता.

त्वचा आणि डोळ्यांचे रक्षण करा

रंगकाम सुरू असताना मास्क घाला, डोळ्यांवर चष्मा लावा आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. तसेच डोक्यावर रुमाल बांधून ठेवा, जेणेकरून रंग किंवा त्याची धूळ थेट त्वचेवर आणि केसांवर पडणार नाही.

DIWALI HOUSE PAINTING HEALTH SAFETY TIPS
Kitchen Cleaning : स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यासाठी सोप्या आणि प्रभावी टिप्स, जाणून घ्या

लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांना दूर ठेवा

रंगकाम सुरू असताना लहान मुलांना घरापासून दूर ठेवावे. तसेच गर्भवती महिला, वयोवृद्ध आणि श्वसनाचा त्रास किंवा असलेल्या व्यक्तींना या वासापासून आणि धूलिकणांपासून लांब ठेवणेच योग्य ठरते.

जुना रंग काढताना काळजी घ्या

जुना रंग काढताना उडणारी धूळ थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकते, ज्यामुळे श्वासोच्छवास आणि त्वचेची समस्या होऊ शकते. त्यामुळे घराची पूर्ण रंगरंगोटी आणि नीट साफसफाई झाल्यानंतरच घरात परत यावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.