Health Tips : जेवण करताना वारंवार जीभ दातात का अडकते? जाणून घ्या कारणे आणि आरोग्य टिप्स

जेवताना अचानक जीभ दातात अडकणे किंवा ती कापणे ही खूप सामान्य गोष्ट वाटू शकते, पण वारंवार असे होणे आरोग्याशी संबंधित काही इतर समस्यांकडे इशारा करू शकते.
How to prevent biting your tongue while eating meals
How to prevent biting your tongue while eating mealssaam tv
Published On: 

जेवताना अचानक दातात जीभ येणे आणि तिला कट लागणे ही एक सामान्य गोष्ट वाटू शकते. अनेकदा लोक घाईघाईत जेवणे किंवा खाण्याकडे लक्ष न देणे असे समजून याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, जर असे वारंवार होत असेल, तर यामागे काही इतर कारणे असू शकतात. जीभ वारंवार दुखावल्यामुळे वेदना, सूज आणि खाण्या-पिण्यात त्रास होऊ शकतो.

जीभ वारंवार दातात येण्याची प्रमुख कारणे:

दातांची रचना

दात अस्ताव्यस्त असणे, दाताची कडा टोकदार असणे, दात तुटलेला असणे किंवा दाताचे फिलिंग योग्य प्रकारे न होणे यामुळे जीभ त्या भागाशी टकरा येऊन जखमी होऊ शकते. अशा वेळी डेंटिस्टचा सल्ला घेणे योग्य ठरते.

How to prevent biting your tongue while eating meals
Kitchen Cleaning : स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यासाठी सोप्या आणि प्रभावी टिप्स, जाणून घ्या

जिभेवर सूज

काही लोकांच्या जिभेवर सूज येते, ज्यामुळे ती नेहमीपेक्षा मोठी दिसते. अशा स्थितीत जेवताना जीभ दातांच्या मध्ये येण्याची शक्यता वाढते. ॲलर्जी, दुखापत, संसर्ग किंवा इतर आरोग्याच्या समस्यांमुळे जिभेवर सूज येऊ शकते.

जीवनसत्त्वांची कमतरता

शरीरात व्हिटॅमिन बी १२, फोलेट किंवा लोहाची कमतरता असल्यास जिभेमध्ये वेदना, जळजळ किंवा सूज येण्यासारख्या समस्या उद्भवतात.

How to prevent biting your tongue while eating meals
Green Peas : हिरवे वाटाणे वर्षभर ठेवा ताजे आणि टवटवीत, जाणून घ्या साठवण्याच्या दोन सोप्या पद्धती

घाईघाईने जेवणे

अनेकदा जेवताना बोलणे, भराभर अन्न चघळणे किंवा अन्नावर लक्ष न दिल्याने जीभ दातांच्या मध्ये येते.

जीभ कापली गेल्यास काय करावे?

  • जेवताना जीभ हलकी कापली गेल्यास, प्रथम स्वच्छ पाण्याने तोंड हळूवारपणे चूळ भरून स्वच्छ करा.

  • रक्त येत असल्यास, स्वच्छ कापसाने किंवा कपड्याने जखमेवर हलका दाब द्या.

  • जळजळ वाढू नये म्हणून काही वेळ खूप गरम, तिखट किंवा आंबट अन्नपदार्थ खाणे टाळा.

  • रक्तस्त्राव थांबत नसल्यास, जखम खोल असल्यास किंवा गिळताना त्रास होत असेल, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.